मुंबई

शास्त्रीनगर डॉक्टर मारहाण प्रकरणात १९ सप्टेंबरला सुनावणी

CD

शास्त्रीनगर डॉक्टर मारहाण प्रकरण

महिला आरोपीच्या जामिनाला विरोध
मुदतवाढ फेटाळली; १९ सप्टेंबरला सुनावणी

सकाळ वृत्तसेवा
कल्याण, ता. १५ (वार्ताहर) : डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि नर्स यांच्यासोबत झालेल्या कथित मारहाण प्रकरणाची सुनावणी मंगळवारी कल्याण सत्र न्यायालयात झाली. शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे, प्रमोद निकम, रमेश पवार आणि अक्षय करांडे यांच्यासह संबंधित आरोपी न्यायालयात हजर होते. प्रकरणातील महिला आरोपी साधना करांडे यांच्या जामीन अर्जावरही सुनावणी झाली. त्यांना जामीन देऊ नये, अशी भूमिका घेत सरकारी पक्षाने न्यायालयात युक्तिवाद केला.

प्रकरणातील दस्तऐवज आणि पंचनाम्यांचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी २१ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्याची मागणी आरोपी पक्षाने केली; मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळली. त्यामुळे पुढील सुनावणी १९ सप्टेंबरला होणार आहे. या प्रकरणात तब्बल एक हजार ८३२ पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. प्रकरणाचा निकाल लवकर लागावा, यासाठी सुनावणी जलदगतीने सुरू असल्याचे सांगण्यात आले.

रमेश म्हात्रे यांच्यासह अन्य चार आरोपी जामिनावर
रमेश म्हात्रे यांच्यासह अन्य चार आरोपी सध्या जामिनावर बाहेर आहेत. महिला आरोपी साधना करांडे या न्यायालयीन कोठडीत आहेत. १९ सप्टेंबरच्या सुनावणीत दोन प्रमुख साक्षीदारांच्या साक्षीसह महत्त्वाचे युक्तिवाद होणार आहेत. त्यामुळे या सुनावणीकडे लक्ष लागले आहे. महिला आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालय काय निर्णय देते, याबाबतही उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

FDA Crime : ‘क्रीमी डिलाइट’, महावीर डेअरीवर एफडीएची कारवाई; लाखो रुपयांचे पदार्थ आढळले असुरक्षित

Teachers Agitation : सामूहिक रजा घेत शिक्षकांचे आंदोलन; पंचायत समितीवर मोर्चा, पाच तास धरणे आंदोलन, मुख्यालयाची अट शिथिल करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT