मुंबई

झेन जीची ऊर्जा देशाच्या विकासासाठी वापरा - माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद

CD

झेन-जीची ऊर्जा देशाच्या विकासासाठी वापरा
- माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : झेन-जी पिढी ऊर्जेने आणि प्रतिभेने परिपूर्ण आहे. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर ही पिढी तातडीने प्रतिक्रिया देते; मात्र हीच ऊर्जा देशाच्या विकासासाठी वापरली, तर त्यातून मोठी सकारात्मक ताकद निर्माण होऊ शकते, असा संदेश माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिला. लोकशाहीत आपले मत मांडताना घटनात्मक आणि कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

ठाण्यातील देशपांडे परिवाराच्या गणेशोत्सवाला यंदा ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दर्शनासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद ठाण्यात आले होते. जेनरिक आधारचे संस्थापक अर्जुन देशपांडे यांच्या कॅडबरी परिसरातील देव कॉर्पोरा येथील कार्यालयात कोविंद पत्नी व मुलीसह उपस्थित होते. गणरायाचे दर्शन आणि पूजा केल्यानंतर त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी आजच्या तरुण पिढीच्या ऊर्जेचे कौतुक करताना आपल्या तरुणपणातील आठवणीही सांगितल्या.
आजची झेन-जी पिढी आपल्या पालकांना ‘तुम्ही जुन्या पिढीचे आहात, आम्ही नवीन पिढीचे’ असे सांगते, मात्र सुमारे ५० वर्षांपूर्वीची तरुण पिढीही अशाच ऊर्जेने भारलेली होती. काळ बदलतो, नावे बदलतात; मात्र तरुणाईची ऊर्जा आणि नेतृत्वाची क्षमता कायम राहते, असे कोविंद म्हणाले. भगवान कृष्णाच्या उदाहरणातूनही त्यांनी तरुणांच्या ऊर्जा आणि नेतृत्वगुणांचा संदर्भ दिला. या वेळी खासदार संजय राऊत, ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, कलाकार, पोलिस अधिकारी, काशीचे पुजारी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

ठाण्याच्या आठवणींना उजाळा
कोविंद यांनी ठाण्यातील जुन्या आठवणींनाही उजाळा दिला. पहिल्यांदा ठाण्यात आलो, तेव्हा हे शहर आजच्यासारखे मोठे नव्हते, तर एखाद्या गावासारखे वाटत होते, असे त्यांनी सांगितले. आपल्या संघर्षाच्या दिवसांबद्दल बोलताना त्यांनी अत्यंत सामान्य परिस्थितीतून पुढे आल्याची आठवण सांगितली. उन्हाळ्यात पायात चप्पल नसल्याने उन्हापासून वाचण्यासाठी धावत असल्याचेही त्यांनी नमूद केले. सहावीपासून इंग्रजी शिकण्याचा अनुभवही त्यांनी सांगितला.
आपले आयुष्य हे बंद पुस्तक नसून वाचू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी खुले पुस्तक आहे, असे कोविंद म्हणाले. प्रसिद्धीपासून दूर राहण्याच्या आपल्या स्वभावावर भाष्य करताना, स्कूटर चालवणारी व्यक्ती अनेकदा आधी पोहोचते, अशी मिश्कील टिप्पणीही त्यांनी केली.

पुस्तकाची रॉयल्टी घेणार नाही
सुमारे तीन वर्षांपूर्वी आपण एक पुस्तक लिहिले असून, ते हिंदी, गुजराती आणि मराठीसह विविध भाषांमध्ये प्रकाशित होणार असल्याचे कोविंद यांनी सांगितले. पुस्तक प्रकाशित करणाऱ्यांना पूर्ण स्वातंत्र्य देणार असून, त्यातून कोणतीही रॉयल्टी घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Transaction Charges: 2000 रुपयांपेक्षा अधिकच्या यूपीआय व्यवहारांवर 0.4 टक्के टॅक्स; 'या' ग्राहकांसाठी मात्र UPI सेवा मोफत

''तर तोंड काळं करायची वेळी आली असती'', राज ठाकरेंच्या 'त्या' टीकेला CM फडणवीसांनी दिलं प्रत्युत्तर...

IND vs AFG 2nd T20I: 'Toss' चा 'BOSS'! श्रेयस अय्यरने नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; वरूण चक्रवर्तीला नेमकं काय झालं? BCCI म्हणते...

Pune News : पुण्याच्या चारीही दिशांना स्वतंत्र डंबर प्लांट उभारा; महापौर नागपुरे यांचे आयुक्तांना पत्र

Hingoli News : चोंडीत शक्तिपीठ महामार्गाची मोजणी रोखली! ‘जमीन गेली तर जगायचे कसे?’ वृद्ध महिला शेतकऱ्यांचा आक्रोश; तुषार जाधव यांचा पालकमंत्र्यांना थेट इशारा

SCROLL FOR NEXT