मुंबई

भारतीय भाषांच्या सन्मानातूनच ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ साकारेल: अमित शाह

CD

भारतीय भाषांच्या सन्मानातूनच ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ साकारेल
अमित शाह : नवी मुंबईत ‘हिंदी दिवस २०२६’, राजभाषा संमेलनाला सुरुवात

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १५ : सर्व प्रादेशिक भाषा कमळाच्या विविध पाकळ्यांप्रमाणे समृद्ध असून, त्यांचा सन्मान राखत हिंदीला या भाषांमध्ये समन्वय साधणारा ‘मध्यमणी’ बनवूया, असे आवाहन केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांनी केले.

वाशी येथील सिडको एक्झिबिशन अँड कन्व्हेंशन सेंटरमध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राजभाषा विभागातर्फे आयोजित ‘हिंदी दिवस २०२६’ आणि ‘सहाव्या अखिल भारतीय राजभाषा संमेलना’च्या उद्‍घाटनप्रसंगी सोमवारी (ता. १४) ते बोलत होते. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, खासदार नरेश म्हस्के यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर या वेळी उपस्थित होते.

राजभाषा संमेलने केवळ दिल्लीपुरती मर्यादित न ठेवता विविध राज्यांत घेण्याचा निर्णय यशस्वी ठरला असून, त्याअंतर्गत सहावे संमेलन महाराष्ट्रात होत आहे, असे शाह यांनी सांगितले. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव व शिवजयंतीच्या माध्यमातून सांस्कृतिक राष्ट्रवाद जागवला, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासोबत स्वभाषेला महत्त्व देत ‘राजव्यवहार कोश’ तयार केला. ‘वंदे मातरम्’ने स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रीय चेतना निर्माण केली. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देऊन महाराष्ट्राच्या अस्मितेचा सन्मान करण्यात आला आहे. २०२९ पर्यंत ‘हिंदी शब्दसिंधू’ जगातील सर्वांत मोठा शब्दकोश बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते विविध महत्त्वपूर्ण प्रकाशने आणि उपक्रमांचे लोकार्पण करण्यात आले.

इतर भाषा माझ्या मावशीसारख्या : फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय भाषांच्या परस्पर सन्मानावर भर दिला. ‘‘माझी आई मराठी आहे; मात्र देशातील इतर सर्व भाषा माझ्या मावशीसारख्या आहेत. आईचा गौरव करताना मावशीचाही सन्मान राखला पाहिजे,’’ असे ते म्हणाले. मातृभाषेतून शिक्षण घेतल्याने विद्यार्थ्यांची आकलनक्षमता वाढते, असे त्यांनी सांगितले. अटलबिहारी वाजपेयी यांनी संयुक्त राष्ट्रांत हिंदीतून भाषण करून देशाचा गौरव वाढवला. भारतानेही प्रशासकीय कामकाजात भारतीय भाषांचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.

मराठी आणि हिंदी सख्ख्या भगिनी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी आणि हिंदी या देवनागरी लिपीत लिहिल्या जाणाऱ्या सख्ख्या भगिनी भाषा असल्याचे सांगितले. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संत नामदेव यांच्या विचारांनी देशाला दिशा दिली असून, संत नामदेवांच्या रचना ‘गुरू ग्रंथ साहिब’मध्ये समाविष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्रात स्थायिक झालेल्या हिंदी भाषिक नागरिकांनी मराठीचा सन्मान राखत राज्याच्या विकासात योगदान दिले आहे, असेही ते म्हणाले.

शासनाची भाषा सोपी असावी : सुनेत्रा पवार
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर हिंदी दिवस साजरा होणे हा शुभ योग असल्याचे सांगितले. मुंबई आणि नवी मुंबईत विविध भाषिक समाज गुण्यागोविंदाने राहतात, हीच ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ची खरी ओळख असल्याचे त्यांनी नमूद केले. शासनाची भाषा सर्वसामान्यांना सहज समजेल अशी सोपी असावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Transaction Charges: 2000 रुपयांपेक्षा अधिकच्या यूपीआय व्यवहारांवर 0.4 टक्के टॅक्स; 'या' ग्राहकांसाठी मात्र UPI सेवा मोफत

''तर तोंड काळं करायची वेळी आली असती'', राज ठाकरेंच्या 'त्या' टीकेला CM फडणवीसांनी दिलं प्रत्युत्तर...

IND vs AFG 2nd T20I: 'Toss' चा 'BOSS'! श्रेयस अय्यरने नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; वरूण चक्रवर्तीला नेमकं काय झालं? BCCI म्हणते...

Pune News : पुण्याच्या चारीही दिशांना स्वतंत्र डंबर प्लांट उभारा; महापौर नागपुरे यांचे आयुक्तांना पत्र

Hingoli News : चोंडीत शक्तिपीठ महामार्गाची मोजणी रोखली! ‘जमीन गेली तर जगायचे कसे?’ वृद्ध महिला शेतकऱ्यांचा आक्रोश; तुषार जाधव यांचा पालकमंत्र्यांना थेट इशारा

SCROLL FOR NEXT