मुंबई

ज्येष्ठा गौरींच्या आगमनाची लगबग

CD

ठाणे, ता. १६ (बातमीदार) : भाद्रपदमधील महत्त्वाचा सण असलेल्या ज्येष्ठा गौरींचे गुरुवारी (ता. १७) आगमन होणार आहे. रात्री ७ वाजून ५२ मिनिटांपर्यंत चंद्र अनुराधा नक्षत्रात असेपर्यंत गौरींची स्थापना करण्याचा मुहूर्त आहे. त्यानंतर शुक्रवारी (ता. १८) चंद्र ज्येष्ठा नक्षत्रात असताना ज्येष्ठा गौरींचे मनोभावे पूजन केले जाणार आहे. शनिवारी (ता. १९) चंद्र मूळ नक्षत्रात असताना गौरींचे विसर्जन करण्यात येईल.

ज्येष्ठा गौरी म्हणजे हिमालयाची कन्या पार्वती अर्थात आदिशक्तीचे स्वरूप मानले जाते. भाद्रपदमधील शेतात धान्य तयार होत असल्याने या काळात निसर्गातील निर्मितीशक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गौरीपूजन केले जाते. त्यामुळे हा सण निसर्गशक्तीच्या उपासनेशी जोडला गेला आहे. महाराष्ट्रातील काही भागांत ज्येष्ठा गौरींना महालक्ष्मी असेही संबोधले जाते. परंपरेनुसार काही ठिकाणी खड्याच्या गौरी पूजल्या जातात, तर काही ठिकाणी तेरडा वनस्पतीला गौरीचे स्वरूप मानून पूजा केली जाते. काही प्रदेशांत धान्याच्या राशीवर गौरीचे मुखवटे ठेवून पूजन केले जाते. गौरीला १६ प्रकारचे नैवेद्य दाखविण्याचीही प्रथा आहे. सासरी गेलेली कन्या माहेरी लाडाने येते, या भावनेतून गौरीचे स्वागत करून तिचे लाड पुरविले जातात.

साड्यांमध्ये माहेश्वरी, चेक्स इरकलला पसंती
गौराईच्या वस्त्रांमध्ये यंदा माहेश्वरी आणि चेक्स इरकल साड्यांना मोठी मागणी आहे. याशिवाय सहावारी, नऊवारी, नथ नऊवारी, कोळी नऊवारी, ब्राह्मणी नऊवारी, त्रिवेणी नऊवारी, पैठणी, महाराणी, पेशवाई आणि गोल सहावारी साड्या उपलब्ध आहेत. तयार साड्यांच्या किमती साधारण १,२०० ते १,५०० रुपयांपासून सुरू आहेत.

गौराईच्या दागिन्यांमध्ये नव्या डिझाइन्सची भर
गौराईच्या दागिन्यांमध्ये ठुशी, बोरमाळ, लक्ष्मीहार, चपला हार, बाजूबंद, कानातील झुमके, मोहनमाळ, कोल्हापुरी साज, चोकर, नथ, कंबरपट्टा, बांगड्या, मंगळसूत्र, चिंचपेटी, पुतळीहार, मोत्यांच्या माळा आणि विविध प्रकारच्या नथी उपलब्ध आहेत. नव्या डिझाइनमध्ये अष्टपैलू माळ, एकविरा कंठी, थौजा मंगळसूत्र, जडाऊ नथ, चंद्रकोर नथ, मोती चंद्रकोर खोपा, डायमंड कोल्हापुरी साज, झिलमिल पैजण आदींची भर पडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Tax: यूपीआय टॅक्स मागे घेण्याचं राहुल गांधींचं आवाहन; इंदिरा गांधींचा दाखला देत पंतप्रधान मोदींवर घणाघात

HOROSCOPE: वयाची 50 ओलांडली तरी दिसतात तरुण! ‘या’ 6 राशींच्या लोकांचं व्यक्तिमत्त्व आणि आत्मविश्वास असतो जबरदस्त; तुमची रास कोणती?

ICC Rankings : अभिषेक शर्माने पाकिस्तानी फलंदाजाला लोळवले! Ishan Kishan ने त्याचे अव्वल स्थान कायम राखले

Hingoli News : दुष्काळाच्या झळांनी खरीप करपला; शेतकऱ्यांना मदतीची आस! मानसपिंप्रीत पालकमंत्री नरहरी झिरवाळांकडून नुकसानीची पाहणी, एकरी ५० हजारांची मदतीची मागणी

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन दगडूशेठच्या दर्शनाला

SCROLL FOR NEXT