मुंबई

वीज समस्यांवर ‘पॉवरफुल’ अ‍ॅक्शन प्लॅन

CD

उल्हासनगर, ता. १६ (वार्ताहर) : वीज समस्यांनी हैराण उल्हासनगरकरांसाठी महावितरणने आता ‘पॉवरफुल’ अ‍ॅक्शन प्लॅन आखला आहे. आमदार कुमार आयलानी यांच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीत शहराला १०० उच्च क्षमतेचे ट्रान्स्फॉर्मर, भूमिगत केबल नेटवर्क आणि स्मार्ट मीटर तक्रारींच्या निवारणासाठी तांत्रिक पथकासह विशेष वाहन देण्याचा निर्णय झाला. विशेष म्हणजे कामचुकार अधिकाऱ्यांना ‘काम करा अन्यथा बदलीला तयार राहा’ असा इशाराही देण्यात आला.

वारंवार वीज खंडित होणे, वाढीव वीजबिले आणि स्मार्ट मीटरच्या तक्रारींमुळे हैराण झालेल्या उल्हासनगरकरांना दिलासा देण्यासाठी महावितरणने ठोस पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत. आयलानी यांच्या अध्यक्षतेखाली कल्याण पश्चिम येथील महावितरणच्या तेजश्री कार्यालयात झालेल्या बैठकीत संचालक धनंजय औढेकर आणि मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा यांच्यासमोर उल्हासनगरसह म्हारळ, वरप आणि कांबा परिसरातील वीज समस्या मांडण्यात आल्या. शहरातील वीज यंत्रणा मजबूत करण्यासाठी १०० उच्च क्षमतेचे ट्रान्स्फॉर्मर आणि आवश्यक केबल उपलब्ध करून देण्यासह केबल नेटवर्क भूमिगत करण्याचा निर्णय घेण्यात आला.

स्मार्ट मीटरमुळे वाढीव बिल अथवा मीटरसंबंधी तक्रारींचे जागेवरच निवारण करण्यासाठी तांत्रिक पथकासह विशेष वाहन शहरात फिरणार आहे. तक्रारींचा वेळेत निपटारा करण्यासाठी क्यूआर कोड प्रणाली सुरू केली जाणार असून निवासी आणि व्यावसायिक फीडर स्वतंत्र करण्याच्या मागणीलाही सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला. नवीन सबस्टेशनसाठी जागा उपलब्ध होताच निधी देण्याची तयारी महावितरणने दर्शविली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्यावर छगन भुजबळ का बोलत नाहीत? स्वत:च भुजबळांनी सांगितलं कारण

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन दगडूशेठच्या दर्शनाला

Satana News : बागलाणमध्ये सरसकट पीक पंचनाम्यांची मागणी; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा तहसीलदारांना घेराव

Farmer Rasta Roko : विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांनी रोखला महामार्ग; वाहतूक विस्कळीत

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरणात शिवसेना पदाधिकारींच्या अडचणी वाढणार?

SCROLL FOR NEXT