मुंबई

‘मांजर’ चित्रपट मुलाखत (प्रीमियर)

CD

चार मित्रांच्या गोंधळाची धमाल गोष्ट

‘मांजर’ हा चार जिवलग मित्रांच्या आयुष्यात घडणाऱ्या गमती-जमती आणि गोंधळाची विनोदी गोष्ट आहे. प्रेम, मैत्री आणि एकमेकांना मदत करण्याच्या प्रयत्नांतून निर्माण होणाऱ्या परिस्थितीमुळे चित्रपटात हास्याची मेजवानी पाहायला मिळणार आहे. सिद्धार्थ मेनन, ओंकार भोजने, तेजस राऊत, भाग्यश्री लिमये, सयाजी शिंदे, अंशुमन विचारे आणि वैष्णवी आंधळे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन सुशील महादेव यांनी केले आहे. एच३ओ मोशन पिक्चर्स आणि जस्ट राइट फिल्म्स निर्मित ‘मांजर’ येत्या १८ सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. त्यानिमित्ताने चित्रपटातील कलाकारांनी ‘सकाळ’शी संवाद साधला.

सिद्धार्थ मेनन
‘मांजर’ या चित्रपटाची मूळ धाटणी विनोदी आहे. अतिशय वास्तववादी वातावरणात ही कथा मांडण्यात आली असून, चित्रपटाची निर्मितीमूल्येही उच्च दर्जाची आहेत. मात्र, ‘मांजर’ची दुनिया ही पूर्णपणे आपल्या मातीतली आणि अस्सल व्यक्तिरेखांनी भरलेली आहे. ही चार मित्रांची गोष्ट आहे. यात मी, तेजस राऊत, भाग्यश्री लिमये आणि ओंकार भोजने आहोत. चित्रपटाच्या कथानकानुसार, भाग्यश्री आणि मी एकमेकांच्या प्रेमात आहोत. आम्हाला लग्न करायचं आहे; पण काही कारणांमुळे ते शक्य होत नाही. ही अडचण सोडवण्यासाठी आमचे दोन मित्र मदतीला येतात. या दोघांचेही कथेत तितकेच महत्त्व आहे. हा केवळ एका जोडप्याचा आणि त्यांच्या मित्रांचा प्रवास नाही, तर एकमेकांशिवाय राहू न शकणाऱ्या चार जिवलग मित्रांची गोष्ट आहे. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांना एक प्रसन्न आणि मनमोकळे वाटेल. मैत्री, प्रेम आणि माणसांमधील नातेसंबंध हे या कथेत अतिशय सुंदरपणे गुंफलेले आहेत. त्यामुळे हसत-हसत प्रेक्षक चित्रपटगृहाबाहेर पडतील आणि सोबत एक छान, समाधान देणारी भावना घेऊन जातील. याशिवाय, चित्रपटात अनेक आश्चर्यकारक वळणे आहेत. ‘मांजर’ हे नाव का देण्यात आले आहे, याचं उत्तरही चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांना मिळेल. त्या नावामागेही एक गंमत आणि खास कारण दडले आहे.

भाग्यश्री लिमये
‘मांजर’ या चित्रपटात जरी माझी आणि सिद्धार्थची जोडी दाखवण्यात आली असली, तरी तेजस आणि ओंकारची व्यक्तिरेखाही माझ्या तितकीच जवळची आहे. आम्ही चौघेही घट्ट मित्र आहोत. कोणत्याही परिस्थितीत एकमेकांना साथ देणे, हीच या सगळ्यांची मध्यवर्ती गोष्ट आहे. मैत्री म्हणजे काय आणि मित्र एकमेकांसाठी काय करू शकतात, हे या चित्रपटातून पाहायला मिळेल. माझी व्यक्तिरेखा स्वतंत्र विचारांची, ठाम आणि व्यावसायिक क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणीची आहे. हे चौघेही एकमेकांना पूर्ण करतात; पण त्याच वेळी एकमेकांमुळे अडचणीतही सापडतात. त्यामुळे सगळेच छान आणि सुरळीत घडते असे नाही. मात्र, मित्रांमुळे संकटात सापडलो तरी त्या परिस्थितीतही हसू येते. ‘मांजर’मध्ये याच प्रकारचा विनोद आणि गोंधळ पाहायला मिळणार आहे.

तेजस राऊत
या चित्रपटात मी चार मित्रांमधला एक मित्र आहे. या चित्रपटाच्या कथेइतकीच त्याच्याशी जोडली गेलेली नावेही मला भावली. चित्रपटाचे कास्टिंग हळूहळू ठरत गेले. या प्रक्रियेदरम्यान ‘एच३ओ प्रॉडक्शन’च्या तिन्ही निर्मात्यांची माझी भेट झाली. त्यांचे दृष्टिकोन आणि मराठी सिनेमात काहीतरी वेगळे करण्याची त्यांची इच्छा ऐकून मला खूप चांगले वाटले. विशेष म्हणजे, हे त्यांचे पहिलेच मराठी चित्रपटाचे निर्मिती पाऊल आहे. ते हिंदी चित्रपटसृष्टीशी संबंधित असूनही त्यांनी आपला पहिला चित्रपट मराठीत करण्याचा निर्णय घेतला. त्यामागचे कारण म्हणजे त्यांना हा विषय आवडला आणि आमचे दिग्दर्शक सुशील महादेव यांच्यावर त्यांचा विश्वास होता. मराठी कलाकार आणि कलाकृतींबद्दल त्यांच्या मनात खूप आदर आहे.

वैष्णवी आंधळे
या चित्रपटात मी सिद्धार्थची बॉस आहे. तिची स्वतःची कंपनी आहे आणि सिद्धार्थ तिच्या कंपनीत काम करत असतो. त्यामुळे त्यांचे कार्यालयीन जग, त्यांच्यातील नाते आणि त्यातून निर्माण होणाऱ्या विनोदी परिस्थिती चित्रपटात पाहायला मिळतील. या ग्रुपमध्ये एक क्रॉसओवर आहे. या मित्रांमध्ये माझा काय रोल आहे ते चित्रपट पाहिल्यावर कळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Tax: यूपीआय टॅक्स मागे घेण्याचं राहुल गांधींचं आवाहन; इंदिरा गांधींचा दाखला देत पंतप्रधान मोदींवर घणाघात

HOROSCOPE: वयाची 50 ओलांडली तरी दिसतात तरुण! ‘या’ 6 राशींच्या लोकांचं व्यक्तिमत्त्व आणि आत्मविश्वास असतो जबरदस्त; तुमची रास कोणती?

ICC Rankings : अभिषेक शर्माने पाकिस्तानी फलंदाजाला लोळवले! Ishan Kishan ने त्याचे अव्वल स्थान कायम राखले

Hingoli News : दुष्काळाच्या झळांनी खरीप करपला; शेतकऱ्यांना मदतीची आस! मानसपिंप्रीत पालकमंत्री नरहरी झिरवाळांकडून नुकसानीची पाहणी, एकरी ५० हजारांची मदतीची मागणी

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन दगडूशेठच्या दर्शनाला

SCROLL FOR NEXT