मुंबई

चाकू-लोखंडी रॉडचा धाक दाखवत डंपरमधून ३१० लिटर डिझेलची चोरी

CD

चाकू-लोखंडी रॉडचा धाक दाखवत डम्परमधून ३१० लिटर डिझेलची चोरी
नांदगाव येथील घटना; चौघांविरोधात पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पनवेल, ता. १६ (बातमीदार) ः पळस्पे ते जेएनपीए महामार्गावरील नांदगाव परिसरात डम्परचालकाला चाकू आणि लोखंडी रॉडचा धाक दाखवून वाहनातील ३१० लिटर डिझेल चोरी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चार भामट्यांविरोधात पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे.
नबीर सूल दिघी हे पनवेल येथे राहत असून, ते डम्पर घेऊन पळस्पे ते जेएनपीए महामार्गावरून जात होते. नांदगाव परिसरात आल्यानंतर लघुशंकेसाठी त्यांनी डम्पर रस्त्याकडेला उभा केला. यादरम्यान दोन कारमधून चार जण तेथे आले आणि दिघी यांना चाकू आणि लोखंडी रॉडचा धाक दाखवून धमकावत त्यांच्या डम्परमधील डिझेल काढून घेतले. या प्रकारामुळे दिघी यांनी पनवेल शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला असून, घटनेचा अधिक तपास सुरू केला आहे. आरोपींची ओळख पटविण्यासाठी परिसरातील उपलब्ध माहिती तसेच वाहनांबाबत तपास केला जात आहे. महामार्गालगत अशा प्रकारे वाहनचालकांना धमकावून चोरी होत असल्याने या घटनेमुळे वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्यावर छगन भुजबळ का बोलत नाहीत? स्वत:च भुजबळांनी सांगितलं कारण

Marathi News Live Updates : माझ्या चारित्र्यहननाचा प्रयत्न- आदित्य ठाकरे

Satana News : बागलाणमध्ये सरसकट पीक पंचनाम्यांची मागणी; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा तहसीलदारांना घेराव

Farmer Rasta Roko : विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांनी रोखला महामार्ग; वाहतूक विस्कळीत

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरणात शिवसेना पदाधिकारींच्या अडचणी वाढणार?

SCROLL FOR NEXT