मुंबई

गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी, लेझर बीम, स्नो व केमिकल स्प्रेवर बंदी

CD

विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी, लेझर बीम, स्नो व केमिकल स्प्रेवर बंदी
जिल्हाधिकाऱ्यांची प्रतिबंधात्मक अधिसूचना; आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई
पनवेल, ता. १६ (बातमीदार) ः रायगड जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुका शांततेत आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवून पार पडाव्यात, या उद्देशाने जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी तीव्र ध्वनिक्षेपक आणि लेझर लाइटवर बंदी घातली आहे. यासंबंधी प्रतिबंधात्मक अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. हे आदेश पनवेल महापालिका क्षेत्रासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात बंधनकारक राहणार आहेत.
अधिसूचनेनुसार गणेश विसर्जनाच्या मिरवणुकांमध्ये डॉल्बी/डीजे साउंड सिस्टीम, तीव्र क्षमतेचे लेझर बीम लाइट्स, स्नो स्प्रे आणि केमिकल स्प्रे यांच्या वापरास प्रतिबंध केला आहे. १९ सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाचा सहावा दिवस, तर २५ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असल्याने मोठ्या प्रमाणावर विसर्जन मिरवणुका निघणार आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याला होणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. मोठ्या आवाजामुळे काही नागरिकांना श्रवणविषयक त्रास होण्याबरोबरच आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. त्याचप्रमाणे तीव्र क्षमतेच्या लेझर बीम लाइट्समुळे डोळ्यांना इजा होण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. अधिसूचनेचा भंग केल्यास संबंधित व्यक्ती, संस्था, मंडळ अथवा संचालकांवर दंडनीय कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: जरांगे पाटील मुंबई दौऱ्यावर ठाम! मधले मुक्काम रद्द, थेट आझाद मैदान गाठणार; सोबतच्यांना माघारी जाण्याचं आवाहन

Palghar News : रुग्णालय राडा प्रकरणात कुंदन संखेसह 22 जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी; राहुल घरत न्यायालयीन कोठडीत

Marathi News Live Updates : हैद्राबाद गॅझेटियरचा जीआर दुरुस्त करुन द्या- मनोज जरांगे

Endometriosis & Insulin Resistance: एंडोमेट्रिओसिसचा फक्त गर्भाशयावर नाही, ब्लड शुगरवरही परिणाम होतो? नेमकं कारण काय; जाणून घ्या

UPI MDR Fee: 'यूपीआय'वरील शुल्कावरुन होणाऱ्या आरोपांना सरकारचं स्पष्टीकरण; 95 टक्के व्यवहार मोफतच...

SCROLL FOR NEXT