२३ फुटांचा पर्यावरणपूरक ‘मुंबईचा महाराजाधिराज’
टीशू पेपरपासून साकारली १५० किलो वजनाची भव्य गणेशमूर्ती
घाटकोपर, ता. १६ (बातमीदार) ः गणेशोत्सव म्हटला की भव्य सजावट, आकर्षक देखावे आणि उंचच उंच गणेशमूर्ती डोळ्यांसमोर उभ्या राहतात, मात्र पर्यावरणाचे भान जपत भव्यतेसोबतच पर्यावरणपूरकतेचा संदेश देण्याचा अनोखा प्रयत्न साकीनाका, परेरावाडी येथील ओम श्री सिद्धिविनायक मित्र मंडळ मुंबईचा महाराजाधिराज गणेशोत्सव मंडळाने केला आहे.
यंदा मंडळाने तब्बल २३ फूट उंचीची, मात्र अवघे १५० किलो वजनाची पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारली आहे. विशेष म्हणजे ही भव्य मूर्ती टीशू पेपरचा वापर करून तयार करण्यात आली आहे. गेल्या १० वर्षांपासून मंडळाकडून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारण्याची परंपरा जपली जात असून, यंदाच्या मूर्तीने या उपक्रमाला आणखी वेगळे स्वरूप प्राप्त झाले आहे.
यंदाची गणेशमूर्ती घोड्यावर स्वार असलेल्या बाप्पांच्या रूपात साकारण्यात आली आहे. तब्बल २३ फूट उंचीची ही मूर्ती पाहण्यासाठी गणेशभक्तांची उत्सुकता वाढली असून, भव्यतेसोबतच अत्यल्प वजन आणि पर्यावरणपूरक साहित्याचा वापर हे या मूर्तीचे प्रमुख आकर्षण ठरत आहे. मंडळाचे यंदाचे हे ३४ वे वर्ष असून, गेल्या दशकभरापासून पर्यावरणपूरक मूर्ती साकारण्याची परंपरा मंडळाने सातत्याने सुरू ठेवली आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा मंडळाचा हा प्रयत्न कौतुकास्पद ठरत आहे. मंडळाचे अध्यक्ष बंटी खानविलकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.