मुंबई

आज गौराईचे आगमन

CD

आज गौराईचे आगमन
वाशी, ता. १६ (बातमीदार) ः घरोघरी आज गौराईचे उत्साहात आगमन होणार आहे. यासाठी नवी मुंबईतील बाजारपेठा सजल्या असून, खरेदीसाठी महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
गौराईंच्या आगमनानिमित्ताने बाजारपेठेमध्ये गौरीचे मुखवटे आणि इतर सजावलीतील मूर्ती महिलांचे लक्ष वेधून घेत आहेत. शाडूच्या मातीच्या आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचे मुखवटे आणि त्यांच्यावर केलेल्या नक्षीकामामुळे मूर्तीच्या सौंदर्यात भर पडत आहे. शाडूच्या मातीच्या मूर्ती आणि मुखवटे हे वजनाने जड असून, त्यांच्या किमतीही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुखवट्यांपेक्षा अधिक आहेत, मात्र पर्यावरणाच्या संवर्धनासाठी शाडूच्या मुखवट्यांना अधिक मागणी आहे. साच्याचा वापर न करता तीन ते चार फूट मूर्ती बनविण्यासाठी एका कारागिराला पाच ते सहा दिवस लागतात. यासाठी जवळपास ३० ते ३५ किलो शाडूची माती लागते. गरूड, हंस आणि मगर यांच्यावर स्वार तसेच आगरी कोळी समाजामध्ये विविध प्रकारच्या माशावर स्वार झालेल्या गौरीच्या मूर्तीना सध्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

फायबरच्या मूर्तींनाही पसंती
यंदा पारंपरिक मातीच्या मूर्तींसोबतच फायबरच्या गौराईच्या मूर्तींना ग्राहकांची पसंती वाढत आहे. वजनाने हलक्या, टिकाऊ आणि हाताळण्यास सोप्या असल्याने फायबरच्या मूर्तींची मागणी वाढली आहे. विशेष म्हणजे काही मूर्तींमध्ये हात, पाय व मनगट यांसारखे अवयव वेगळे करता येतात. त्यामुळे गौराईला बसवणे, उभे करणे तसेच साडी, दागिने आणि बांगड्यांनी सजवणे सोपे होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्यावर छगन भुजबळ का बोलत नाहीत? स्वत:च भुजबळांनी सांगितलं कारण

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन दगडूशेठच्या दर्शनाला

Satana News : बागलाणमध्ये सरसकट पीक पंचनाम्यांची मागणी; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा तहसीलदारांना घेराव

Farmer Rasta Roko : विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांनी रोखला महामार्ग; वाहतूक विस्कळीत

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरणात शिवसेना पदाधिकारींच्या अडचणी वाढणार?

SCROLL FOR NEXT