गणेश विसर्जनाच्या निमित्ताने ‘लोकसंवाद २०२६’
गणेशकुंडावर भक्तांना शासकीय योजनांची माहिती
पालघर, ता. १६ (बातमीदार) : दीड दिवसाच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी पालघर शहरातील गणेशकुंड येथे मोठ्या संख्येने गणेशभक्त व नागरिक उपस्थित होते. आपल्या लाडक्या गणरायाचा विसर्जनाचा सोहळा पार पडत असतानाच, नागरिकांशी थेट संवाद साधण्याची संधी साधत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘लोकसंवाद २०२६’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
जिल्हा माहिती कार्यालय, पालघर यांच्या वतीने गणेशभक्त व नागरिकांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, शासनाचे उपक्रम आणि नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या विविध सुविधांची सविस्तर माहिती देण्यात आली. शासकीय योजनांची माहिती केवळ प्रसिद्धी माध्यमांपुरती मर्यादित न ठेवता ती थेट नागरिकांपर्यंत पोहोचविणे आणि पात्र लाभार्थ्यांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ घेण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करणे, हा ‘लोकसंवाद २०२६’च्या मागचे प्रमुख उद्देश आहे हे जिल्हा माहिती कार्यालयाने स्पष्ट केले. त्यांच्याकडून गणेश विसर्जनासाठी एकत्र आलेल्या भाविकांशी संवाद साधत‘योजना जाणून घ्या, पात्र असाल तर लाभ घ्या’असा संदेश यावेळी देण्यात आला. गणेशोत्सवाच्या माध्यमातून श्रद्धा, सामाजिक बांधिलकी आणि जनजागृतीचा संगम साधत ‘लोकसंवाद २०२६’ उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.