मुंबई

डोक्यावर गणपती घेऊन नाचत विसर्जन

CD

डोक्यावर गणपती घेऊन नाचत विसर्जन
खरोशीच्या नामदेव पाटील यांची २५ वर्षांची परंपरा कायम
पेण, ता. १६ (वार्ताहर) : रायगड जिल्ह्यासह पेण तालुक्यात गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना खरोशी गावातील नामदेव कृष्णा पाटील यांनी डोक्यावर गणपतीची मूर्ती घेऊन, हात न लावता नाचवत विसर्जन करण्याची गेल्या २५ ते ३० वर्षांची परंपरा आजही जपली आहे. गणेशभक्ती आणि श्रद्धेचे अनोखे दर्शन घडविणारा हा विसर्जन सोहळा पंचक्रोशीतील भाविकांचे लक्ष वेधून घेतो.
दीड दिवसापासून पाच दिवसांच्या गणपती विसर्जनादरम्यान नामदेव पाटील डोक्यावर गणरायाची मूर्ती घेऊन वाजतगाजत निघतात. वाद्यांच्या तालावर तल्लीन होत शरीराचा तोल सांभाळत ते संपूर्ण गावात नाचत फिरतात. विसर्जन मिरवणुकीदरम्यान गावातील प्रत्येक मंदिरासमोर थांबून भाविकांना गणरायाचे दर्शन घडविले जाते. वयाच्या पंधराव्या वर्षापासून गणेशभक्तीत रमलेल्या नामदेव पाटील यांनी ही परंपरा आजवर अखंडपणे जपली आहे.
खरोशीतील ही परंपरा केवळ विसर्जनापुरती मर्यादित नसून, गणरायाप्रती असलेल्या श्रद्धेचे प्रतीक मानली जाते. ही परंपरा पाहण्यासाठी रायगड जिल्ह्यासह पंचक्रोशीतील भाविक खरोशी गावात येतात. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही अनेक वर्षांची भक्ती आणि परंपरा जपणारे नामदेव पाटील यांचे हे अनोखे भक्तिभावाचे दर्शन पुढील पिढीसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI MDR Fee: 'यूपीआय'वरील शुल्कावरुन होणाऱ्या आरोपांना सरकारचं स्पष्टीकरण; 95 टक्के व्यवहार मोफतच...

Prataprao Pawar : कृषी, शिक्षणातील समस्या सोडविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करा

Harry Brook Record: इंग्लंडच्या कर्णधार हॅरी ब्रूकने रचला इतिहास, T20 वर्ल्ड कप विजेत्या कर्णधार रोहित शर्मालाही हे जमलं नाही

BCCI ची मोठी घोषणा! WPL 2027 च्या तारखा जाहीर; २८ ऑक्टोबरला ऑक्शन, फ्रँचायझीला या महिन्याची दिलीय डेडलाईन, नेमकं काय?

Road Development : धनंजय मुंडेंच्या मागणीला यश! लोखंडी सावरगाव-बर्दापूर फाटा रस्ता होणार चौपदरी; १०४.४९ कोटींच्या कामाची निविदा प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT