मुंबई

डहाणूजवळ १३०० एकरांवर आंतरराष्ट्रीय कृषी बाजार

CD

डहाणूजवळ १,३०० एकरांवर आंतरराष्ट्रीय कृषी बाजार

आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र उभारण्याचा शासनाचा मानस

कासा, ता. १६ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यातील डहाणूजवळ सुमारे १,३०० एकर क्षेत्रावर जागतिक दर्जाची आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ उभारण्याचा शासनाचा मानस असल्याची घोषणा पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे अध्यक्ष जयकुमार रावल यांनी केली. मुंबई येथे आयोजित‘मॅग्नेट ॲग्रीबिझनेस इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टर मीट’मध्ये ते बोलत होते.

डहाणू येथे प्रस्तावित ही बाजारपेठ केवळ घाऊक कृषी बाजार न राहता आंतरराष्ट्रीय कृषी व्यापार आणि वाहतूक केंद्र म्हणून विकसित करण्याचे नियोजन आहे. या बाजारपेठेमुळे पालघर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील कृषीमालाला देशांतर्गत तसेच जागतिक बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. कृषीमालाची प्रतवारी, साठवणूक, प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि निर्यात यांना चालना मिळण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, ‘मॅग्नेट २.०’अंतर्गत आधुनिक कृषी पायाभूत सुविधांसाठी एक हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीच्या संधी निर्माण करण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी शासनासोबत खासगी क्षेत्राने भागीदार म्हणून सहभागी व्हावे, असे आवाहन रावल यांनी केले. डहाणूतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय कृषी बाजाराच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राला राष्ट्रीय आणि जागतिक बाजारपेठेशी जोडण्याचा प्रयत्न असल्याचेही या वेळी त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: जरांगे पाटील मुंबई दौऱ्यावर ठाम! मधले मुक्काम रद्द, थेट आझाद मैदान गाठणार; सोबतच्यांना माघारी जाण्याचं आवाहन

Seva Sanklap Abhiyan : ५० लाखांहून अधिक नागरिकांना मोफत जमीन नोंदणी, १७ सप्टेंबरला दीपोत्सवाचा शुभारंभ; महिनाभर चालणार ‘सेवा-संकल्प अभियान’

Gold Hallmarking Charges : दसरा-दिवाळीपूर्वी सोनं-चांदी महागणार? BIS या निर्णयामुळे खरेदीदारांच्या खिशाला बसणार कात्री

MPSC Exam : एक दोन गुणाने यश हुलकावणी देत होते; अखेर योगेशने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मिळविले यश

Stray Dog Attacks : परळीत पिसाळलेल्या कुत्र्याचा 35 वर जणांना चावा, शहरात भीती, 26 जणांवर उपचार सुरू

SCROLL FOR NEXT