मुंबई

वारलीपाड्यात शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू

CD

वारलीपाड्यात शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू
संध्याकाळच्या वेळेतही प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध
नेरूळ, ता. १६ (बातमीदार) : दिवसभर कामावर जाणाऱ्या नागरिकांसह महिला व ज्येष्ठ नागरिकांना सोयीच्या वेळेत आरोग्य सेवा मिळावी, यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या घणसोली विभागातील अश्विननगर वारलीपाडा परिसरात शहरी आरोग्यवर्धिनी केंद्राचे मंगळवारी (ता. १५) लोकार्पण करण्यात आले. सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत केंद्र सुरू राहणार असल्याने परिसरातील नागरिकांना प्राथमिक उपचारांची सुविधा जवळच उपलब्ध होणार आहे.
केंद्राच्या लोकार्पणप्रसंगी महापौर सुजाता पाटील, आरोग्य समिती सभापती डॉ. जयाजी नाथ, समाजकल्याण समिती सभापती रंजना सोनवणे, माजी महापौर तथा नगरसेवक सुधाकर सोनवणे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजेश म्हात्रे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन चिटणीस, विभाग अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त संजय तडवी, कार्यकारी अभियंता यशवंत कापसे आदी उपस्थित होते. या उपक्रमामुळे नागरिकांना घराजवळ आणि सोयीच्या वेळेत आरोग्य सुविधा मिळणार असल्याचे सुधाकर सोनवणे यांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या १५व्या वित्त आयोगांतर्गत नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ५९ शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रांना मंजुरी मिळाली आहे. या केंद्रांमध्ये डॉक्टर, नर्स आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी उपलब्ध असतील. असंसर्गजन्य आजारांची तपासणी, प्रतिबंध व नियंत्रण, माता-बाल आरोग्यसेवा, किशोरवयीन आरोग्य, मूलभूत मौखिक आरोग्यसेवा इत्यादी सुविधा येथे मिळणार आहेत. तसेच संसर्गजन्य आजारांपासून बचाव, वैयक्तिक स्वच्छता आणि पोषणाबाबत जनजागृती केली जाणार आहे.

परिसरात वृक्षारोपण
लोकार्पणावेळी महापौर व मान्यवरांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. सुधाकर सोनवणे यांनी नियोजनबद्ध पद्धतीने विकसित केलेल्या दाट वनराईच्या परिसरात हे केंद्र असल्याने येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना हिरवेगार आणि प्रसन्न वातावरण मिळणार असल्याचे महापौर सुजाता पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Tax: यूपीआय टॅक्स मागे घेण्याचं राहुल गांधींचं आवाहन; इंदिरा गांधींचा दाखला देत पंतप्रधान मोदींवर घणाघात

HOROSCOPE: वयाची 50 ओलांडली तरी दिसतात तरुण! ‘या’ 6 राशींच्या लोकांचं व्यक्तिमत्त्व आणि आत्मविश्वास असतो जबरदस्त; तुमची रास कोणती?

ICC Rankings : अभिषेक शर्माने पाकिस्तानी फलंदाजाला लोळवले! Ishan Kishan ने त्याचे अव्वल स्थान कायम राखले

Hingoli News : दुष्काळाच्या झळांनी खरीप करपला; शेतकऱ्यांना मदतीची आस! मानसपिंप्रीत पालकमंत्री नरहरी झिरवाळांकडून नुकसानीची पाहणी, एकरी ५० हजारांची मदतीची मागणी

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन दगडूशेठच्या दर्शनाला

SCROLL FOR NEXT