मुंबई

जड वाहनांनी श्वास कोंडला

CD

वज्रेश्वरी, ता. १६ (बातमीदार) : भिवंडी शहरात वाडा-भिवंडी, भिवंडी-ठाणे, भिवंडी-नाशिक, अंजूर-काल्हेर-ठाणे, भिवंडी-कल्याण तसेच अंजूरफाटा-कामण या मार्गांवरून दिवसभर होणाऱ्या जड वाहनांच्या वाहतुकीमुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी, कर्मचारी, प्रवासी आणि रुग्णांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सेक्युलर)चे सरचिटणीस ॲड. किरण चन्ने यांनी केला आहे. याबाबत त्यांनी प्रशासनाला निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
महिनाभरापासून शहरातील मुख्य मार्गांसह अंतर्गत रस्त्यांवरही दिवसभर वाहतूक कोंडी होत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. कोंडीमुळे नागरिकांचा वेळ वाया जाण्यासोबतच आर्थिक, मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत असल्याचे चन्ने यांनी म्हटले आहे. जड वाहनांना शहरात प्रवेशासाठी निर्धारित वेळ निश्चित असतानाही काही वाहने दिवसभर शहरात प्रवेश करत असल्याची तक्रार निवेदनातून केली आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर अतिरिक्त ताण येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. जड वाहनांच्या प्रवेशाच्या वेळेबाबत महत्त्वाच्या ठिकाणी स्पष्ट सूचना फलक लावावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे.
रस्त्यांच्या कडेला अनधिकृत उभी जड वाहने तातडीने हटवून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी. तसेच महत्त्वाच्या अंतर्गत मार्गांवरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विशेष नियोजन करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. मागण्यांची दखल घेऊन वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी तातडीने उपाययोजना न झाल्यास गणेशोत्सवाच्या काळात भिवंडी प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

विसर्जन मार्गांवर बंदोबस्त ठेवा!
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या गणेशमूर्तींच्या विसर्जन मिरवणुकांमुळे वाहतूक कोंडी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे विसर्जन मार्गांवर निर्धारित वेळेत वाहतूक पोलिसांसह संबंधित पोलिसांची पूर्णवेळ नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

उपाययोजनांवर कार्यवाही करा!
जड वाहनांची वाहतूक निर्धारित वेळेतच मर्यादित ठेवणे, महत्त्वाच्या ठिकाणी सूचना फलक उभारणे, अनधिकृत पार्किंग हटविणे आणि वाहतूक पोलिसांची प्रभावी नियुक्ती करणे या उपाययोजनांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी ॲड. चन्ने यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI ची मोठी घोषणा! WPL 2027 च्या तारखा जाहीर; २८ ऑक्टोबरला ऑक्शन, फ्रँचायझीला या महिन्याची दिलीय डेडलाईन, नेमकं काय?

Road Development : धनंजय मुंडेंच्या मागणीला यश! लोखंडी सावरगाव-बर्दापूर फाटा रस्ता होणार चौपदरी; १०४.४९ कोटींच्या कामाची निविदा प्रसिद्ध

Saudi Arabia Drone Attack : मुस्लिमांसाठी पवित्र मक्कावर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न ; सौदीने हवेतच केले नष्ट, भारताने व्यक्त केली चिंता

Gangapur News : शिक्षकांची बंद केलेली वेतनवाढ आदेश त्वरित रद्द करावा; आमदार सतीश चव्हाण यांची मागणी

Nagpur News : सहकाराचा गाडा रुळावरून घसरला! दहा वर्षांत आठ सहकारी पतसंस्था डबघाईस, २२ संस्था अवसायनात; मौद्यात सहकार संकटात

SCROLL FOR NEXT