मुंबई

रेल्वे स्थानकांवरील कंत्राटी कामगारांसाठी शिवसेना आक्रमक

CD

३२३ कामगारांच्या रोजगारासाठी शिवसेना आक्रमक
सिडकोचे कंत्राट संपणार; मध्य रेल्वेकडे तातडीने निर्णय घेण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १६ : सिडकोकडून मध्य रेल्वेकडे वर्ग करण्यात आलेल्या नवी मुंबईतील विविध रेल्वे स्थानकांवर कार्यरत ३२३ कंत्राटी सफाई कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. सिडकोकडील विद्यमान कंत्राट १ ऑक्टोबर २०२६ला संपणार असल्याने नव्या व्यवस्थेत या कामगारांच्या रोजगाराचे काय होणार, याबाबत अनिश्चितता आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना पत्र पाठवून कामगारांना सेवेत सामावून घेण्याची मागणी केली आहे.
खांदेश्वर ते वाशी, वाशी ते ऐरोली तसेच तरघर, बामणडोंगरी आणि खारकोपर या स्थानकांचे व्यवस्थापन सिडकोकडून मध्य रेल्वेकडे हस्तांतरित झाले आहे. या स्थानकांवर २७४ आणि ४९ असे एकूण ३२३ सफाई कामगार गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने सेवा बजावत आहेत. व्यवस्थापन बदलल्याने या कामगारांच्या उपजीविकेवर परिणाम होऊ नये, अशी भूमिका म्हस्के यांनी मांडली आहे.
नवीन कंत्राटदारामार्फत काम देताना पूर्वीपासून कार्यरत असलेल्या सर्व कामगारांना प्राधान्याने सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे. तसेच व्यवस्थापन हस्तांतरणामुळे एकाही कामगाराची कपात होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याची विनंती करण्यात आली आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घ्या
कामगारांचा रोजगार आणि त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह हा महत्त्वाचा प्रश्न असल्याने मध्य रेल्वे आणि सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करावी, अशी मागणी खासदार म्हस्के यांनी केली आहे. या बैठकीत कामगारांच्या प्रश्नावर तातडीने तोडगा काढून त्यांना रोजगाराचे संरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: जरांगे पाटील मुंबई दौऱ्यावर ठाम! मधले मुक्काम रद्द, थेट आझाद मैदान गाठणार; सोबतच्यांना माघारी जाण्याचं आवाहन

Seva Sanklap Abhiyan : ५० लाखांहून अधिक नागरिकांना मोफत जमीन नोंदणी, १७ सप्टेंबरला दीपोत्सवाचा शुभारंभ; महिनाभर चालणार ‘सेवा-संकल्प अभियान’

Gold Hallmarking Charges : दसरा-दिवाळीपूर्वी सोनं-चांदी महागणार? BIS या निर्णयामुळे खरेदीदारांच्या खिशाला बसणार कात्री

MPSC Exam : एक दोन गुणाने यश हुलकावणी देत होते; अखेर योगेशने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मिळविले यश

Stray Dog Attacks : परळीत पिसाळलेल्या कुत्र्याचा 35 वर जणांना चावा, शहरात भीती, 26 जणांवर उपचार सुरू

SCROLL FOR NEXT