मुंबई

जिल्हा परिषदेत ६२ वर्षांपासून गणेशोत्सव

CD

जिल्हा परिषदेत ६२ वर्षांपासून गणेशोत्सव
अलिबाग, ता. १६ : रायगड जिल्हा परिषदेत गेल्या ६२ वर्षांपासून गणेशोत्सवाची परंपरा सुरू आहे. यंदाही १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान गणेशोत्सव साजरा केला जात असून, विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेतील पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी गणरायाच्या पूजा, आरती तसेच विविध कार्यक्रमांत सहभागी होत आहेत.
जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना १९६४ मध्ये करण्यात आली. १९८४ पासून ‘शिवतीर्थ’ प्रशासकीय इमारतीत गणेशोत्सव सुरू झाला. मात्र, नवीन इमारतीचे बांधकाम सुरू झाल्याने २०२३ पासून कुंटेबाग येथील कार्यालयात उत्सव साजरा केला जात आहे. सजावटीत पौराणिक, अध्यात्मिक व सामाजिक संदेश देणारे देखावे तसेच शासनाच्या योजनांची माहिती देण्याची परंपरा आहे. भजन, नृत्य, विविध स्पर्धांसह सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. २०१० पासून अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सुरू केलेला ‘शिवतीर्थ’ वाद्यवृंदही गणेशोत्सवात सादरीकरण करतो. अनंत चतुर्दशीला मिरवणुकीने अलिबाग समुद्रकिनारी गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते.
मंडळाचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष जालिंदर पठारे, कार्याध्यक्ष खंडू बागुल, सचिव संजय कवठेकर व कोषाध्यक्ष सुनील भुरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: जरांगे पाटील मुंबई दौऱ्यावर ठाम! मधले मुक्काम रद्द, थेट आझाद मैदान गाठणार; सोबतच्यांना माघारी जाण्याचं आवाहन

Seva Sanklap Abhiyan : ५० लाखांहून अधिक नागरिकांना मोफत जमीन नोंदणी, १७ सप्टेंबरला दीपोत्सवाचा शुभारंभ; महिनाभर चालणार ‘सेवा-संकल्प अभियान’

Gold Hallmarking Charges : दसरा-दिवाळीपूर्वी सोनं-चांदी महागणार? BIS या निर्णयामुळे खरेदीदारांच्या खिशाला बसणार कात्री

MPSC Exam : एक दोन गुणाने यश हुलकावणी देत होते; अखेर योगेशने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मिळविले यश

Stray Dog Attacks : परळीत पिसाळलेल्या कुत्र्याचा 35 वर जणांना चावा, शहरात भीती, 26 जणांवर उपचार सुरू

SCROLL FOR NEXT