मुंबई

पाचमाड येथील गणेश मंदिर ठरतेय धार्मिक पर्यटनाचे नवे आकर्षण

CD

पाचमाड येथील गणेश मंदिर ठरतेय धार्मिक पर्यटनाचे नवे आकर्षण

आकर्षक रंगसंगती व कलापूर्ण सजावटीने मंदिराचे रुपडे पालटले

विक्रमगड, ता. १६ (बातमीदार) : विक्रमगड तालुक्यातील पाचमाड गावातील श्री गणेश मंदिराने सध्या भाविक तसेच पर्यटकांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे. आकर्षक रंगसंगती, कलापूर्ण नक्षीकमामुळे मंदिराचे रूप अधिक खुलून आले असून, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येथे भाविकांचा ओघ वाढला आहे. पालघर जिल्ह्यातील विविध भागांसह जिल्ह्याबाहेरील भाविक व पर्यटकही श्री गणेशाच्या दर्शनासाठी पाचमाड येथे भेट देत असल्याचे चित्र दिसून येत आहे. पाचमाड गावातील स्थानिक नागरिकांच्या पुढाकाराने तसेच ग्रामस्थांच्या सहकार्याने मंदिराच्या सौंदर्यीकरणाचे काम करण्यात आले. मंदिराच्या बाह्य व अंतर्गत भागात विविध आकर्षक रंगांचा वापर करण्यात आल्याने मंदिराचे रूप अधिक प्रसन्न आणि मनमोहक झाले आहे. भिंतींवर करण्यात आलेले कलापूर्ण नक्षीकाम, रंगांची आकर्षक सांगड आणि सजावटीमुळे मंदिर परिसराला वेगळेच धार्मिक व सांस्कृतिक स्वरूप प्राप्त झाले आहे.
श्री गणेश मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. श्री गणेशाच्या भक्तीबरोबरच मंदिराचे आकर्षक सौंदर्य यामुळे पाचमाड येथील गणेश मंदिराने अल्पावधीतच आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात हे मंदिर विक्रमगड तालुक्यातील धार्मिक पर्यटनाचे एक महत्त्वाचे केंद्र म्हणून नावारूपास येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: जरांगे पाटील मुंबई दौऱ्यावर ठाम! मधले मुक्काम रद्द, थेट आझाद मैदान गाठणार; सोबतच्यांना माघारी जाण्याचं आवाहन

Seva Sanklap Abhiyan : ५० लाखांहून अधिक नागरिकांना मोफत जमीन नोंदणी, १७ सप्टेंबरला दीपोत्सवाचा शुभारंभ; महिनाभर चालणार ‘सेवा-संकल्प अभियान’

Gold Hallmarking Charges : दसरा-दिवाळीपूर्वी सोनं-चांदी महागणार? BIS या निर्णयामुळे खरेदीदारांच्या खिशाला बसणार कात्री

MPSC Exam : एक दोन गुणाने यश हुलकावणी देत होते; अखेर योगेशने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मिळविले यश

Stray Dog Attacks : परळीत पिसाळलेल्या कुत्र्याचा 35 वर जणांना चावा, शहरात भीती, 26 जणांवर उपचार सुरू

SCROLL FOR NEXT