मुंबई

झाडांभोवतालचे सिमेंट कॉंक्रिटीकरण हटवण्याचे प्रकरण

CD

एकत्रित बैठक घेऊन तोडगा काढा
झाडांभोवतालचे सिमेंट आणि काँक्रीटीकरणप्रकरणी न्यायालयाचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : सिमेंट आणि काँक्रीटीकरणामुळे वृक्ष कोसळण्याच्या धोक्यांबाबत अधिकाऱ्यांनी एकत्र बैठक घ्यावी, याचिकाकर्त्यांच्या शिफारशींवर एकत्र बसून चर्चा करावी आणि या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करावा, असे आदेश बुधवारी (ता. १६) उच्च न्यायालयाने मुंबई, ठाणे महापालिकेला दिले. त्या बैठकीला याचिकाकर्त्यांनाही उपस्थित राहण्याचे आदेश दिले.
सिमेंट आणि काँक्रीटीकरणामुळे वृक्षांचे आयुर्मान कमी होऊन वृक्ष कोसळतात, असा दावा करत ठाण्यातील पर्यावरणप्रेमी रोहित जोशी यांनी ॲड. रॉनिता भट्टाचार्य यांच्यामार्फत, तर मुंबईतील झाडांसदर्भात वकील सागर उगले यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. त्या याचिकेवर बुधवारी न्या. अजय गडकरी आणि न्या. कमल खाता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्या वेळी झाडे, वृक्षांच्या मुळांची जमिनीखाली वाढ योग्यरीत्या होण्यासाठी त्यांच्या सभोवतालातील ठारावीक भाग मोकळा ठेवणे आवश्यक आहे, मात्र तशी व्यवस्था झाडांभोवती नसल्यामुळे झाडं कोसळत असल्याचा दावा याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. रोनिता भट्टाचार्य यांनी केला, मात्र मुंबई प्रत्येक झाडाभोवती विशिष्ट जागा सोडणे शक्य नाही. अनेक ठिकाणी निमुळते, अरुंद रस्ते आहेत. असे न्यायालयाने याचिकाकर्त्यांना सांगितले. तथापि, आम्ही याच समस्येवर तोडगा काढण्यासाठी काही तज्ज्ञांचा सल्ला घेतला असल्याचे याचिकाकर्त्यांकडून न्यायालयाला सांगण्यात आले. त्यावर याचिकाकर्त्यांनी याआधी सुचवलेल्या शिफारशींबाबत आम्ही सकारात्मक असून, त्याची अमंलबजावणी कऱण्यास तयार असल्याचे मुंबई आणि ठाणे पालिकेकडून न्यायालयाला सांगितले. त्याची दखल घेऊन न्यायालयाने याचिकाकर्त्यांनी तज्ज्ञांसह मुंबई आणि ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घ्यावी, एकत्रित बैठक घेऊन झाडांच्या प्रश्नांवर चर्चा करावी आणि तोडगा काढावा, सध्या अधिकारी गणेशोत्सवाच्या कामात व्यग्र आहे, त्यामुळे गणेशोत्सवानंतर बैठक घेण्याचे आदेश देऊन न्यायालयाने सुनावणी चार आठवड्यांनी ठेवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : कळंबा कारागृहात दंगा- आरडाओरड करण्यास मनाई केल्याने अधिकाऱ्याला मारहाण

Manoj Jarange Patil: मोठी बातमी! हैदराबाद गॅझेटियरमध्ये नावंसुद्धा सापडली; विखे पाटलांसह शिष्टमंडळ हैदराबादला जाणार?

Vidyadhar Anaskar : राज्य सहकारी बँकेचे ५,७४५ कोटींचे विक्रमी नेटवर्थ; ठेवी कमी करण्याचा निर्णय व्यावसायिक गणितातून

पाकिस्तानचं नवीन नाटक! PCB नंतर आता हॉकी संघाने भारतात येण्यास दिला नकार; म्हणतात, आमच्या खेळाडूंना सुरक्षित वातावरण हवंय...

CM Devendra Fadnavis : मनोज जरांगे पाटील यांच्या १३ पैकी १२ मागण्या मान्य! आंदोलन करून गणेशोत्सवावर ताण आणू नका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT