मुंबई

जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘आनंद गुरुकुल’

CD

जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘आनंद गुरुकुल’

शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची माहिती; जिल्हा परिषदेचा उपक्रम राज्यभर

सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १६ : विद्यार्थ्यांना बालवयातच खेळाची आवड निर्माण व्हावी, यासाठी नाशिकसह राज्यातील पाच ते दहा जिल्ह्यांमध्ये ‘आनंद गुरुकुल क्रीडा प्रबोधिनी’ सुरू करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे दिली.

जिल्हा परिषदेच्या ‘ज्ञानयात्री’ उपक्रमाची माहिती देण्यासाठी बुधवारी (ता. १६) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी साईलता सामलेटी उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसाठी ‘ज्ञानयात्री’ उपक्रम राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील २५ ते ५० विद्यार्थ्यांना शिक्षकांसह नाशिक शहरात आणून विविध शैक्षणिक व पर्यटनस्थळांना भेटी, सैनिक प्रशिक्षण केंद्राची माहिती तसेच जिल्हा परिषदेच्या कामकाजाची ओळख करून दिली जात आहे. आतापर्यंत चार हजार ९४ विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांना व्यापक अनुभव देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविला जात असल्याचे भुसे यांनी सांगितले.

सुपर १०० पॅटर्न राज्यभर
आर्थिकदृष्ट्या दुर्बल पालकांच्या गुणवंत मुलांसाठी जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या ‘सुपर ५०’ उपक्रमाचा विस्तार करून आता ‘सुपर १००’ करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वसतिगृह, भोजन आणि शिक्षणासाठी क्लासेसची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. या उपक्रमाचे सकारात्मक परिणाम दिसून आल्याने विद्यार्थ्यांची संख्या ५० वरून १०० करण्यात आली आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येत असून, हा पॅटर्न राज्यभर राबविण्याचे नियोजन असल्याचे भुसे यांनी सांगितले.

शाळांच्या सुविधांवर भर
जिल्हा परिषद शाळांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध नसल्याबाबत विचारले असता, ही बाब कमी-अधिक प्रमाणात असू शकते, मात्र आगामी वर्षभरात शाळांच्या सुविधांमध्ये निश्चितच फरक दिसून येईल, असे भुसे यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : कळंबा कारागृहात दंगा- आरडाओरड करण्यास मनाई केल्याने अधिकाऱ्याला मारहाण

Manoj Jarange Patil: मोठी बातमी! हैदराबाद गॅझेटियरमध्ये नावंसुद्धा सापडली; विखे पाटलांसह शिष्टमंडळ हैदराबादला जाणार?

Vidyadhar Anaskar : राज्य सहकारी बँकेचे ५,७४५ कोटींचे विक्रमी नेटवर्थ; ठेवी कमी करण्याचा निर्णय व्यावसायिक गणितातून

पाकिस्तानचं नवीन नाटक! PCB नंतर आता हॉकी संघाने भारतात येण्यास दिला नकार; म्हणतात, आमच्या खेळाडूंना सुरक्षित वातावरण हवंय...

CM Devendra Fadnavis : मनोज जरांगे पाटील यांच्या १३ पैकी १२ मागण्या मान्य! आंदोलन करून गणेशोत्सवावर ताण आणू नका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT