जेएनपीए मार्गावर महावाहतूक कोंडी
नवी मुंबई, ता. १६ : नवी मुंबई, उरण आणि पनवेल या महत्त्वाच्या नागरी व औद्योगिक क्षेत्रांना जोडणाऱ्या गव्हाण फाटा जंक्शनवर बुधवारी सायंकाळनंतर अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली. उरण, पनवेल आणि चिरनेर या तिन्ही दिशांना जाणाऱ्या रस्त्यांवर वाहनांच्या अनेक किलोमीटर लांब रांगा लागल्या. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली असून, महामार्गावर वाहतूक पोलिसांची अनुपस्थिती आणि रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या अनधिकृत कंटेनरमुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
नवी मुंबईतून जेएनपीए, उरण आणि पनवेलकडे जाणाऱ्या मार्गांवर सायंकाळनंतर वाहनांचा मोठा ताण निर्माण झाला. अटल सेतूपासून नवी मुंबई, पनवेल आणि उरणकडे जाणाऱ्या मार्गांवरही कोंडी झाली. गणेशोत्सवामुळे गेल्या तीन दिवसांपासून अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध आहेत. त्यामुळे जेएनपीएकडे जाणाऱ्या मार्गावर मागील दोन दिवसांत वाहनांची संख्या वाढल्याने कोंडीत आणखी भर पडली. उलवे नोडचा वाढता विकास, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम आणि स्थानिक वाहतुकीमुळे या प्रमुख जोडमार्गावर खासगी तसेच व्यावसायिक वाहनांचा मोठा ताण आहे. बंदराची क्षमता वाढल्याने दररोज हजारो कंटेनर ट्रकची वर्दळ असते. बंदरातील सुमारे ८० टक्के मालाची वाहतूक रस्त्याने होत असल्याने महामार्गावर ट्रकच्या लांब रांगा लागतात. मुंबई-नवी मुंबईतील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अवजड वाहने गव्हाण फाट्याकडे वळविण्यात येत असल्याने या जंक्शनवरील भार वाढला आहे. कंटेनर वेळेत बंदरात पोहोचत नसल्याने लॉजिस्टिक्स क्षेत्रालाही आर्थिक फटका बसत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.