जुन्या टाकाऊ वस्तूंचे स्टॅंड उपक्रम अनियंत्रित
उपक्रमावर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमलेले पर्यवेक्षक गायब; कपडे, अन्य वस्तू अत्यवस्थ, इतरत्र फेकले जात असल्याने अस्वच्छता
बेलापूर, ता. ११ (बातमीदार) ः स्वच्छ सर्वेक्षणअंतर्गत माझं शहर-माझा सहभाग या संकल्पनेतून नवी मुंबई महापालिकेने सुरू केलेला जुन्या टाकाऊ वस्तूंच्या पुनर्वापराचा उपक्रम सध्या प्रशासकीय दुर्लक्षामुळे अनियंत्रित झाला आहे. गरजूंसाठी ठिकठिकाणी उभारलेल्या स्टँडवरील कपडे व अन्य वस्तू सर्वत्र विखुरल्याने परिसरात मोठी अस्वच्छता पसरत आहे.
नागरिकांकडून बरऱ्याचदा रोजच्या ओल्या व सुक्या कचऱ्यासोबत जुन्या वस्तूदेखील कचऱ्यामध्ये दिल्या जातात. यामधील अनेक वस्तू पुन्हा वापरात आणल्या जाऊ शकतात. अशा वस्तूंचा पुनर्वापर व्हावा व दैनंदिन कचऱ्याचे प्रमाण कमी व्हावे, यादृष्टीने तत्कालीन महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रभागात टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर अनुषंगाने विविध विभागांमध्ये ठिकठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण स्टॅण्ड उभे करण्यात आलेले आहेत. नको असेल ते द्या, हवे असेल ते घ्या, अशा आशयाने सुरू केलेल्या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद असला तरी ठिकठिकाणी बेघर, गर्दुल्ले या स्टँडवरील कपड्यांना कुठेही फेकून देत आहेत. परिणामी, आजूबाजूचा परिसर अस्वच्छ होत उपक्रमाला बाधा येत आहे.
पर्यवेक्षक गायब
पालिकेने यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमलेले पर्यवेक्षक गायब झाल्याने या चांगल्या उपक्रमाला शहरात गालबोट लागले आहे. पर्यवेक्षक, कर्मचारी यांच्याकडून या उपक्रमाची जबाबदारी पार पाडली जात आहे का? स्वच्छता राखली जात आहे का? याबाबत चौकशी करत उपक्रमावर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.