पालिकेच्या ‘त्या’ शाळेला अखेर सुट्टी जाहीर
माजी नगरसेवक जीएस पाटील यांच्या प्रयत्नांना यश
तुर्भे, ता. १६ (बातमीदार) ः गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी शहरातील सर्व खासगी व पालिका शाळांना अधिकृत सुट्टी जाहीर केली होती, परंतु दिवा गावातील पालिकेच्या एका शाळेने मनमर्जी कारभार करत शाळा सुरूच ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. माजी नगरसेवक जी. एस. पाटील यांनी याविरोधात आक्रमक भूमिका घेत जाब विचारल्यानंतर अखेर प्रशासनाला ही शाळा बंद करावी लागली.
दिवा गावात पालिकेची शाळा क्रमांक ९१ (काचेची शाळा) ही आयटेक एज्युकेशन नावाच्या खासगी संस्थेला चालवायला दिली आहे, परंतु या संस्थेने कोणत्याही प्रकारचा विचार न करता गणेशोत्सवाच्या कालावधीत सुट्टी जाहीर केली असतानादेखील शाळा सुरू ठेवली होती. त्यानुसार माजी नगरसेवक जी. एस. पाटील यांनी बुधवारी (ता. १६) शाळा गाठत बंद केली. दरम्यान, मागील वर्षीच्या गणेशोत्सवातदेखील आयुक्तांनी शाळा सुरू ठेवली होती. त्या वेळीदेखील या शाळेला विचारणा झाली होती, परंतु त्या वेळी कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही.
गणेशोत्सवाच्या कालावधीत शाळा सुरू ठेवणे हे चुकीचे आहे. आपण महाराष्ट्रात राहतो. हा गणेशोत्सव सर्वात मोठा उत्सव आहे. अशा प्रकारची मनमर्जी सहन करून घेतली जाणार नाही. ही शाळा चालवणाऱ्या संस्थेची माहिती तपासून कारवाई केली जाईल.
- सुजाता पाटील, महापौर, पालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.