कासा, ता. १७ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील हळदपाडा (महुडूळपाडा) परिसरात मंगळवारी (ता. १५) रात्री बिबट्याने गोठ्यात शिरून शेळ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात दोन शेळ्या जागीच ठार झाल्या, तर एक शेळी गंभीर जखमी झाली. गोठ्यातील बैलाच्या अंगावरही बिबट्याच्या पंजाचे ओरखडे दिसून आले.
हळदपाडा येथील ठमी शंकर बेंदर (वय ६०) यांच्या कुटुंबाची जंगलात झोपडी असून, त्यालगतच्या गोठ्यात जनावरे व शेळ्या बांधतात. कुटुंबीय रात्रीच्या वेळी याच ठिकाणी वास्तव्यास असतात. दरम्यान, घटनेच्या रात्री पती आजारी असल्याने त्या पाड्यातील आपल्या घरी राहण्यासाठी गेल्या होत्या. या वेळी रात्री बिबट्या गोठ्याच्या कुडाच्या भिंतीतील पोकळीतून आत शिरल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
गोठ्यात चार बैल आणि तीन शेळ्या बांधलेल्या होत्या. बिबट्याने प्रथम एका बैलावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या अंगावर पंजाचे ओरखडे आढळून आले. त्यानंतर बिबट्याने तीन शेळ्यांवर हल्ला केला. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मृत जनावरांचा पंचनामा करीत अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविला.
बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करा
वरखंडा-हळदपाडा परिसरात बिबट्याच्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. चारही बाजूंनी जंगल असल्याने ग्रामस्थांना दररोज शेतीच्या कामासाठी जंगलात जावे लागते. तसेच लहान मुले पायी शाळेत जातात. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडण्यापूर्वी वन विभागाने तातडीने उपाययोजना करून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य निखिल कांटेला यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.