मुंबई

नवी मुंबईच्या राजाच्या दर्शनास भक्तांची मांदियाळी

CD

नवी मुंबईच्या राजाच्या दर्शनास भक्तांची मांदियाळी
जयपूर येथील प्रति सिटी पॅलेस आकर्षणाचा केंद्रबिंदू
तुर्भे, ता. १७ (बातमीदार) ः नवी मुंबईतील पहिला मानाचा सार्वजनिक गणेशोत्सव म्हणून ख्याती असलेल्या शिवछाया मित्र मंडळचा नवी मुंबईचा राजाच्या दर्शनासाठी गणेशभक्तांची गर्दी होत आहे. ५६व्या वर्षात पदार्पण केलेल्या या महोत्सवात यंदा जयपूर येथील प्रसिद्ध सिटी पॅलेसची प्रतिकृती साकारली असून, हा देखावा नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.
नवी मुंबईच्या राजाच्या सभा मंडपात दरवर्षी विविध आकर्षक व समाज प्रबोधनात्मक देखावे चितारले जातात. हे देखावे पाहण्यासाठी तसेच नवी मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, वसई, पनवेल, उरण या परिसरातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. या वर्षीही आगळ्या-वेगळ्या ढंगात ५६ व्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले असताना सिटी पॅलेस जयपूर हा देखावा साकारला आहे. यावर्षी दैनंदिन पूजापाठ, भजन तसेच भजन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविलेल्या भजन कलावंतांचा सन्मान, गरीब व गरजू महिलांना साडी-चोळी वाटप, शिलाई मशीन वाटप, रक्तदान शिबिर, नेत्रचिकित्सा शिबिर तसेच शालेय विद्यार्थ्यांना वह्यावाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

बच्चे कंपनीसाठी खास फन फेअरचे आयोजन
यावर्षी मंडळाने जयपूर येथील प्रसिद्ध सिटी महालाची प्रतिकृती साकारली असून, व्यसनाधीनतेमुळे तरुण पिढीचे होणारे नुकसान टळावे याबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न मंडळाने केला आहे. तसेच, बच्चेकंपनीसाठी खास फन फेअरचेही आयोजन करण्यात आलेले आहे. याचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शिवछाया मित्र मंडळाचे अध्यक्ष अंकुश वैती यांनी या उपक्रमाविषयी माहिती देताना केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rekha Gupta Organ Donation : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी रेखा गुप्तांचा मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प; नागरिकांनाही आवाहन

आमचे मार्ग आता जुळत नाहीत! Prithvi Shaw अन् आकृती अगरवाल यांचा वेगळा होण्याचा निर्णय; क्रिकेटपटूच्या पोस्टची चर्चा...

लग्नानंतर स्वयंपाक शिकली मेघना एरंडे; म्हणाली- माहेरची आणि सासरची लोकं गणेशोत्सवात आमच्या घरी येतात आणि...

Tata Sons Reappointment : RBI च्या निर्देशानंतर टाटा समूहात मोठा उलटफेर! नोएल टाटांचा विरोध डावलून एन. चंद्रशेखरन यांची अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती

NTA Exam Calendar 2026-27 Out : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! जेईई मेन, यूजीसी-नेटसह प्रमुख परीक्षांच्या तारखा जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT