मुंबई

रायगडमध्ये एफडीएची धडक कारवाई

CD

रायगडमध्ये एफडीएची धडक कारवाई
११३ प्रकरणांत नऊ लाख ४७ हजारांचा दंड शासन जमा
पेण, ता. १७ (वार्ताहर) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारात भेसळयुक्त, मुदतबाह्य तसेच आरोग्यास घातक पदार्थांची विक्री होऊ नये, यासाठी अन्न व औषध प्रशासन, पेण यांच्याकडून रायगड जिल्ह्यात तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत आतापर्यंत ११३ प्रकरणांत दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, सुमारे नऊ लाख ४७ हजार रुपयांचा दंड शासन जमा करण्यात आला आहे.
गणेशोत्सवाच्या काळात मिठाई, मावा, बेकरी उत्पादने, हॉटेल, रेस्टॉरंट तसेच इतर खाद्य आस्थापनांची तपासणी केली जात आहे. आतापर्यंत ३१० अन्न नमुने घेण्यात आले आहेत. त्यापैकी १०७ नमुने प्रमाणित, चार अप्रमाणित तर चार नमुने असुरक्षित आढळले आहेत. तसेच ६१८ आस्थापनांची तपासणी करून १२९ सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या असून, आठ परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

८९ लाखांचा प्रतिबंधित अन्नसाठा जप्त
प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या विक्रीप्रकरणी ३९ प्रकरणांत कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत ८९ लाख ५८ हजार १४५ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणांमध्ये १९ जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी तपासणी मोहीम सुरू असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन रायगड, पेणचे अधिकारी मिलिंद महानगाडे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Pune Highway Traffic : ठाणे-मुंबईकडे जाणार्‍या वाहनांसाठी मोठी बातमी! महामार्ग पोलिसांकडून 'या' दिवशी अवजड वाहनांना प्रवेशबंदी, प्रवासाच्या नियोजनापूर्वी वाचा ही अपडेट

Central Railway: खोपोलीकरांसाठी लोकलला 'ब्रेक'! पळसदरी-खोपोलीदरम्यान दोन महिने विशेष ब्लॉक, पाहा वेळापत्रक

Crime News: धक्कादायक! चार वर्षीय चिमुकलीसोबत ८५ वर्षीय वृद्धाचे अश्लील कृत्य, डोंबिवलीत संतापाची लाट

Latest Marathi News Update : पहलगाम दहशतवादी हल्ला प्रकरणी आरोपी सैफुल्ला उर्फ ​​साजिद जट्ट याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

Raigad Teacher Recruitment: रायगड ZP शिक्षक भरतीत सहा तालुके पूर्णपणे वगळले; शून्य शिक्षकी शाळांचा प्रश्न अधिक गंभीर

SCROLL FOR NEXT