मुंबई

मुकणेपाडा परिसरात कचऱ्याचे साम्राज्य

CD

भिवंडी, ता. १७ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील सावंदे ग्रामपंचायत हद्दीलगत असलेल्या मुकणेपाडा परिसरात नागरी समस्यांचा बोजवारा उडाला आहे. परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून, तो उचलण्यासाठी स्वच्छता व आरोग्य विभागाकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही दुर्लक्ष केले जात असल्याने महिला, लहान मुले व नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे तातडीने कचरा उचलून परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणी त्रस्त नागरिकांकडून केली जात आहे.

शहर व ग्रामीण भागात सार्वजनिक गणेशोत्सवास सुरुवात झाल्यामुळे सर्वत्र उत्साहाचे व आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे परिसरात स्वच्छता असणे आवश्यक आहे. तालुक्यातील सावंदे गावाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत असलेल्या मुकणेपाड्यात आदिवासी वस्ती आहे. परिसरातील रस्त्यावर ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. पाऊस पडत असल्याने कचऱ्याचा ढिगारा ओला होऊन त्याची दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे ये-जा करणाऱ्या लोकांना नाक मुठीत धरून जावे लागत आहे. तसेच या परिसरातील रस्त्यावरील अनेक पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरत असून, नागरिकांमध्ये घबराट निर्माण होत आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त प्रशासनाने याबाबत तातडीने लक्ष द्यावे आणि रस्त्यावर साचलेला कचरा उचलून परिसर स्वच्छ करावा. तसेच तेथे जंतुनाशक औषध फवारणी करण्यात यावी, पथदिवे तातडीने सुरू करण्यात यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुका युवक कार्याध्यक्ष सूरज खरे यांनी लेखी निवेदनाद्वारे भिवंडी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

भिवंडी : सावंदे गावातील मुकणेपाडा परिसरात कचऱ्याचे ढीग साचले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Bushra Bano IPS? : 'अस्सलाम-अलैकुम' म्हटल्यामुळे IPS अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली? बंगालमधील 'त्या' व्हिडिओवरून गदारोळ

Fact Check : विराट कोहली २०२७ चा वन डे वर्ल्ड कप इंग्लंडसाठी खेळणार? भारतीय क्रिकेटला हादरवून टाकणाऱ्या वृत्तामागचे सत्य

Tata News: चंद्रशेखरन यांचा U-Turn? पुन्हा Tata चेअरमनपदी निवड! निर्णय होताच शेअर्स 5% वाढले; नेमकं काय घडलं?

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या टीमवर दुःखाचा डोंगर; लेखकाचं अकस्मात निधन, सचिन गोस्वामींची भावुक श्रद्धांजली

UPI MDR 2026 : अमेरिकेच्या दबावामुळे युपीआय वर एमडीआर? केंद्र सरकारने दिले स्पष्टीकरण; जाणून घ्या नेमकं प्रकरण

SCROLL FOR NEXT