मुंबई

वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती

CD

वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती
आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश; उद्योगांच्या बँक हमीचाही होणार अभ्यास
पनवेल, ता. १७ (बातमीदार) : राज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून प्रदूषण नियंत्रणासाठी घेतली जाणारी बँक हमीची रक्कम वाढविण्याबाबत अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने राज्यस्तरीय समिती गठित केली आहे. पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार असून, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांचा समितीत समावेश करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने जारी केला आहे.
औद्योगिक विकास आणि पर्यावरण संरक्षण यांच्यात समतोल साधण्यासाठी समिती विविध औद्योगिक क्षेत्रांचा अभ्यास करणार आहे. उद्योगांकडून प्रदूषण नियंत्रणासाठी घेण्यात येणाऱ्या बँक हमीच्या रकमेत वाढ करण्याची आवश्यकता आहे का, याबाबत तज्ज्ञांच्या समन्वयाने आढावा घेतला जाणार आहे. तसेच वायू व जलप्रदूषण रोखण्यासाठी तांत्रिक उपाययोजना आणि धोरणात्मक निर्णयांबाबत शिफारशी करण्यात येणार आहेत.
समितीत आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह सुधीर मुनगंटीवार आणि अमल महाडिक यांचा समावेश आहे. उद्योग व खनिकर्म विभाग, पर्यावरण विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कोळसा, औष्णिक वीज आणि स्टील उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी समितीचे सदस्य असतील.

प्रदूषण नियंत्रणासाठी बँक हमीचा आढावा
उद्योगांकडून प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांसाठी घेतली जाणारी बँक हमी पुरेशी आहे का, याबाबत समिती अभ्यास करणार आहे. प्रदूषणामुळे पर्यावरणावर होणारे परिणाम लक्षात घेऊन या रकमेत वाढ करण्याची गरज असल्यास त्याबाबत सरकारला शिफारस केली जाणार आहे. यासोबतच प्रदूषण नियंत्रणासाठी उद्योगांनी कोणत्या तांत्रिक उपाययोजना कराव्यात, याचाही समितीच्या अहवालात समावेश होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam Latest Update : ...अखेर राज्यसेवा 2025 च्या मुलाखती ढकलल्या पुढे; नवी तारीख काय? मुख्य परीक्षेबाबत अद्यापही अस्पष्टता!

Rekha Gupta Organ Donation : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी रेखा गुप्तांचा मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प; नागरिकांनाही आवाहन

आमचे मार्ग आता जुळत नाहीत! Prithvi Shaw अन् आकृती अगरवाल यांचा वेगळा होण्याचा निर्णय; क्रिकेटपटूच्या पोस्टची चर्चा...

लग्नानंतर स्वयंपाक शिकली मेघना एरंडे; म्हणाली- माहेरची आणि सासरची लोकं गणेशोत्सवात आमच्या घरी येतात आणि...

Latest Marathi News Update : NTA कडून वर्षभरातील परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर

SCROLL FOR NEXT