मुंबई

कळवा रुग्णालयाला दुरुस्तीचा ‘डोस’

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे : शहरासह जिल्ह्यातील गरीब आणि गरजू रुग्णांसाठी आधार ठरलेल्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे रुपडे पालटणार आहे. राज्य सरकारच्या मूलभूत सुविधा विकासाच्या विशेष योजनेतून सुमारे ५५ कोटी ३१ लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यातून रुग्णालयाच्या इमारतीसह उपचार सुविधांचेही बळकटीकरण केले जाणार आहे. ठाणे महापालिकेने या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.

कळवा येथील ठाणे महापालिकेच्या रुग्णालयात मोठ्या संख्येने सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे केवळ इमारतीची दुरुस्ती करण्याऐवजी रुग्णांच्या उपचाराचा अनुभव अधिक सुलभ करण्यावर या कामात भर देण्यात आला आहे. नवीन वॉर्ड, शस्त्रक्रिया कक्ष, डायलिसिस सुविधा, दिव्यांगांसाठी स्वतंत्र ओपीडी, पॅलिएटिव्ह केअर तसेच मातृ-बाल आरोग्यसेवांसाठी आवश्यक सुविधांची उभारणी केली जाणार आहे.

रुग्णालयाच्या आराखड्यात विविध विभागांसाठी मोठ्या प्रमाणावर खाटांची तरतूद करण्यात आली आहे. पहिल्या मजल्यावर महिला सर्जिकल, स्त्रीरोग, पोस्ट-नॅटल, महिला ऑर्थो, पुरुष ऑर्थो आणि पुरुष सर्जिकल असे प्रत्येकी ५० खाटांचे सहा वॉर्ड प्रस्तावित आहेत. त्याशिवाय ४८ खाटांचा पुरुष बालरुग्ण विभाग असणार आहे. त्यामुळे या आराखड्यात एकूण ३४८ खाटांची क्षमता प्रस्तावित करण्यात आली आहे. प्रत्येक ५० खाटांच्या वॉर्डसाठी सुमारे सहा हजार चौरस फूट जागा उपलब्ध होणार आहे.

मातांसाठी स्वतंत्र व्यवस्था
प्रसूती विभागात स्वतंत्र प्रसूती कक्षासह प्रतीक्षा कक्ष, ड्रेसिंग, निर्जंतुकीकरण, प्रसूतीनंतरची देखभाल, विश्रांती, उपकरणे आणि वॉशिंग रूमची व्यवस्था केली जाणार आहे. गंभीर अवस्थेतील गर्भवतींसाठी एक्लॅम्पसिया रूम तसेच डॉक्टर, भूलतज्ज्ञ आणि परिचारिकांसाठी स्वतंत्र जागा प्रस्तावित आहे.

नवजात बालकांसाठीही सुविधा
बालरुग्ण विभागात स्टेप-डाऊन एनआयसीयू, कांगारू मदर केअर, तपासणी व वर्गीकरण कक्ष, आयपीसीयू आणि ह्युमन मिल्क बँक यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे प्रसूतीनंतर माता आणि नवजात बालकांच्या उपचारासाठी एकाच ठिकाणी अधिक सक्षम सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

इमारतीपासून यंत्रणांपर्यंत बदल
या कामात स्ट्रक्चरल दुरुस्ती, आरसीसी व सिव्हिल कामांसोबत विभाजन, फरशी, फॉल्स सीलिंग, वॉटरप्रूफिंग, रंगकाम आणि अंतर्गत सजावटीची कामे केली जाणार आहेत. प्लम्बिंग, अग्निसुरक्षा यंत्रणा, फायर अलार्म, फर्निचर आणि ईटीपी प्लांटचीही तरतूद करण्यात आली आहे. रुग्णालयातील विद्युत व्यवस्थेत अंतर्गत व बाह्य प्रकाशयोजना, वातानुकूलन, बिल्डिंग मॅनेजमेंट सिस्टीम, नर्स कॉल आणि पब्लिक ॲड्रेस सिस्टीम यांचा समावेश आहे. त्यामुळे दुरुस्तीचा हा डोस केवळ इमारतीपुरता मर्यादित न राहता रुग्णालयातील उपचार व्यवस्थेलाही नवी चालना देणारा ठरणार आहे.

२४ महिन्यांत काम पूर्ण
रुग्णालयाच्या दुसऱ्या टप्प्यातील या कामासाठी २४ महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. सुविधांचा विस्तार आणि विद्यमान व्यवस्थेचे बळकटीकरण झाल्यानंतर कळवा रुग्णालयावरील रुग्णांचा वाढता भार हाताळण्यास मदत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE Three-Language Policy : सीबीएसईच्या त्रिभाषा धोरणाला मुदतवाढ? सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची सूचना, अंमलबजावणी 2027-28 पर्यंत ढकलण्याची शक्यता

Mumbai-Pune Highway Traffic : ठाणे-मुंबईकडे जाणार्‍या वाहनांसाठी मोठी बातमी! महामार्ग पोलिसांकडून 'या' दिवशी अवजड वाहनांना प्रवेशबंदी, प्रवासाच्या नियोजनापूर्वी वाचा ही अपडेट

Central Railway: खोपोलीकरांसाठी लोकलला 'ब्रेक'! पळसदरी-खोपोलीदरम्यान दोन महिने विशेष ब्लॉक, पाहा वेळापत्रक

Latest Marathi News Update : पहलगाम दहशतवादी हल्ला प्रकरणी आरोपी सैफुल्ला उर्फ ​​साजिद जट्ट याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

Raigad Teacher Recruitment: रायगड ZP शिक्षक भरतीत सहा तालुके पूर्णपणे वगळले; शून्य शिक्षकी शाळांचा प्रश्न अधिक गंभीर

SCROLL FOR NEXT