मुंबई

वाहतूक कोंडी पोलिस तोडगा काढणार

CD

वाहतूक कोंडीवर सर्व्हिस रोडचा उतारा
अटल सेतू, पळस्पे व गव्हाण फाटा मार्गावर विशेष योजना
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १७ : अटल सेतू ते पळस्पे आणि पनवेल महामार्गावर गेल्या काही दिवसांत झालेल्या अभूतपूर्व वाहतूक कोंडीची नवी मुंबई वाहतूक पोलिस विभागाने गंभीर दखल घेतली असून, विविध उपाययोजना लागू केल्या आहेत. बंदीनंतर अवजड वाहतूक सुरू झाल्याने ही समस्या निर्माण झाली होती. यावर तातडीने मात करण्यासाठी प्रशासनाने सेवा रस्ते सुरू केले असून, महामार्गावरील अवजड वाहनांवर कडक नियंत्रण मिळवले आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासमोर वहाळ गावाजवळ अवजड वाहने उभी करण्यासाठी विशेष पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून, गव्हाण फाटा ते एअरपोर्ट मार्गावर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ६० वाहतूक पोलिस व वॉर्डन तैनात करण्यात आले आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्ण कार्यान्वित झाले असून, १ ऑक्टोबरपासून येथे आंतरराष्ट्रीय विमानांची वाहतूक अधिक प्रमाणात वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिस, सिडको, एमएसआरडीसी आणि न्हाई यांच्या संयुक्त विद्यमाने या परिसरातील कोंडी फोडण्यासाठी महत्त्वाच्या योजनांवर काम सुरू आहे. चिर्ले येथील जोड रस्त्याचे (कनेक्टिंग रोड) काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग ते उरणदरम्यानच्या सेवा रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर दुचाकी वाहनांना पूर्णपणे या मार्गाने जोडले जाईल. यामुळे मुख्य महामार्ग फक्त चारचाकी आणि अवजड वाहनांसाठी मोकळा राहील. सर्व प्राधिकरणांकडून रस्ते व उड्डाणपुलांची कामे वेगाने सुरू असून, येत्या सहा महिन्यांत हे जोडरस्ते व पूल उपलब्ध झाल्यावर वाहतुकीस पर्यायी मार्ग मिळून कोंडी कायमची सुटेल.

गेल्या दोन महिन्यांत आम्ही बऱ्याच प्रमाणात वाहतूक वळवून नियोजन केले आहे. सर्व प्राधिकरणांचे प्रकल्प वेगाने सुरू असून, वाहनांची वाढती संख्या विचारात घेऊन नवीन उड्डाणपूल व सेवा रस्त्याचे पर्याय उपलब्ध केले जात आहेत. पुढील काही महिन्यांत ही कामे पूर्ण होताच कोंडीतून नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.
- डॉ. राहुल खाडे, पोलिस उपायुक्त, नवी मुंबई वाहतूक विभाग

वाहतूक विभागाच्या योजना
- उलवे कोस्टल रोड व एअरपोर्ट लिंक रोडवर अटल सेतू (शिवाजीनगर) ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारा सहा पदरी रस्त्यामुळे गव्हाण फाट्याला वळसा न घालता विमानतळावर थेट पोहोचता येईल.
- गव्हाण फाटा येथील कोंडी टाळण्यासाठी थेट पनवेलला जोडणारा उड्डाणपूल मार्च २०२७ पर्यंत पूर्ण होण्याचे उद्दिष्ट आहे.
- मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे ते उरण सर्व्हिस रोडवर येत्या तीन महिन्यांत सेवा रस्त्याचे काम पूर्ण करून दुचाकी वाहनांना वेगळे मार्गस्थ करणे
- मोरबे-कळंबोली-जेएनपीए कॉरिडॉर हा जेएनपीएकडे जाणाऱ्या मालवाहू ट्रक्ससाठी स्वतंत्र मार्गिका विकसित करून स्थानिक प्रवाशांच्या मार्गातील अडथळे दूर केले जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

72-Year-Old Paragliding : आजोबांनी Gen-Z लाही लाजवलं ! वयाच्या ७२व्या वर्षी घेतली आकाशात झेप, २४ हजार फूट उंचीवरून पॅराग्लायडिंग, VIDEO VIRAL

IND vs AFG 3rd T2OI: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच... श्रेयस अय्यरने Playing XI मध्ये केलाय एक बदल; जाणून घ्या संघ

Crime News: धक्कादायक! चार वर्षीय चिमुकलीसोबत ८५ वर्षीय वृद्धाचे अश्लील कृत्य, डोंबिवलीत संतापाची लाट

Latest Marathi News Update : पहलगाम दहशतवादी हल्ला प्रकरणी आरोपी सैफुल्ला उर्फ ​​साजिद जट्ट याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

Kasari Power Protest: गणेशोत्सवात अखंडित विजेसाठी कासारी ग्रामस्थांचे महावितरणला साकडे; पोतराज आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT