मुंबई

पोलादपुरात ५३० गौरींचे आगमन

CD

पोलादपुरात ५३० गौरींचे आगमन
आज पारंपरिक पद्धतीने गौरीपूजन
पोलादपूर, ता. १७ (बातमीदार) : गणरायापाठोपाठ पोलादपूर तालुक्यात गुरुवारी मुहूर्तावर सर्वांच्या लाडक्या गौराईचे पारंपरिक पद्धतीने वाजत-गाजत आगमन झाले. तालुक्यात तब्बल ५३० गौरींची स्थापना करण्यात आली असून, शुक्रवारी पारंपरिक पद्धतीने गौरीपूजन होणार आहे. तंत्रज्ञानाच्या युगातही कोकणातील ग्रामीण भागात सण-उत्सवांच्या माध्यमातून संस्कृती आणि परंपरा जपली जात असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
‘आली सोन्याच्या पावलांनी, गौराई आली माणिक-मोत्यांच्या पावलांनी’, अशी पारंपरिक गीते गात महिलांनी गौराईचे स्वागत केले. सुवासिनींनी सुंदर वस्त्रालंकार परिधान करून झिम्मा-फुगडीचा फेर धरला. गौरीला सजविण्यात आले होते. या वेळी तेरड्याच्या डहाळ्यांचे विशेष आकर्षण होते. काही घरांमध्ये खड्यांची किंवा तेरड्याची गौर बसविण्यात आली आहे. काही ठिकाणी तर ज्येष्ठा-कनिष्ठा व महालक्ष्मीची पूजा केली जाते.
तंत्रज्ञानामुळे पूजाविधीच्या पद्धती बदलत असल्या तरी पोलादपूरसारख्या ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने गौरीपूजन आणि ओवसा साजरा केला जात आहे. त्यामुळे सणांचे सांस्कृतिक महत्त्व आणि परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होत आहे.

माहेरवाशिणीचे स्थान
गौरीला गणपतीची आई मानले जाते. त्यामुळे शंकर, पार्वती आणि गणपती सहकुटुंब घरी आल्याची भावना या परंपरेमागे आहे. गौराईला घरातील माहेरवाशिणीचे स्थान देऊन साडी नेसवून नटविले जाते. गौरीची स्थापना व पूजेची तयारीही पारंपरिक पद्धतीने केली जाते.

ओवसा परंपरेची श्रद्धेने जपणूक
कोकणातील रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांत ओवसा किंवा ववसा ही परंपरा आजही श्रद्धेने पाळली जाते. लग्नानंतर गौरी पूर्वाषाढा नक्षत्रात आल्यास नववधूचा पहिला ओवसा करण्याची पद्धत आहे. ओवशासाठी सुपात पाच प्रकारच्या भाज्या, पाच वेलींची पाने, पाच प्रकारची फळे, करंडा, फणी, खण-नारळाची ओटी आणि वानाच्या पानावर सुटे पैसे ठेवले जातात. सुवासिनी प्रथम गौरीला हळद-कुंकू लावून पूजा करतात. त्यानंतर भरलेले सूप गौरीसमोर तीन वेळा खाली ओढण्याची प्रथा असून, यालाच गौरीला ‘ओवसणे’ असे म्हटले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE Three-Language Policy : सीबीएसईच्या त्रिभाषा धोरणाला मुदतवाढ? सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची सूचना, अंमलबजावणी 2027-28 पर्यंत ढकलण्याची शक्यता

Mumbai-Pune Highway Traffic : ठाणे-मुंबईकडे जाणार्‍या वाहनांसाठी मोठी बातमी! महामार्ग पोलिसांकडून 'या' दिवशी अवजड वाहनांना प्रवेशबंदी, प्रवासाच्या नियोजनापूर्वी वाचा ही अपडेट

Central Railway: खोपोलीकरांसाठी लोकलला 'ब्रेक'! पळसदरी-खोपोलीदरम्यान दोन महिने विशेष ब्लॉक, पाहा वेळापत्रक

Latest Marathi News Update : पहलगाम दहशतवादी हल्ला प्रकरणी आरोपी सैफुल्ला उर्फ ​​साजिद जट्ट याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

Raigad Teacher Recruitment: रायगड ZP शिक्षक भरतीत सहा तालुके पूर्णपणे वगळले; शून्य शिक्षकी शाळांचा प्रश्न अधिक गंभीर

SCROLL FOR NEXT