मुंबई

जनसामान्यांची सेवा हाच खरा धर्म

CD

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. १७ : प्रशासकीय यंत्रणेने अधिक संवेदनशील, कार्यक्षम आणि लोकाभिमुख बनून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ सहजतेने पोहोचवला पाहिजे. सर्व प्रशासकीय विभागांनी समन्वयाने एकत्र येऊन जनसामान्यांची अविरत सेवा करणे, हाच आपला खरा धर्म असून, प्रत्येकाने जबाबदारीने आणि आग्रही प्रयत्नांतून गरजू लाभार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणले पाहिजे, असे प्रतिपादन कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाचव्या मजल्यावरील समिती सभागृहात गुरुवारी (ता. १७) कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘सेवा संकल्प’ अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख नितीन पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने आदी मान्यवर उपस्थित होते.

जनतेच्या समस्यांचे निराकरण तत्परतेने होणे हीच प्रशासनाची खरी ताकद आहे. नागरिकांना कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, तर प्रशासनाने स्वतः लोकांच्या दारात पोहोचले पाहिजे. सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक घटकाला, विशेषतः वंचित आणि गरजूंना योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी मिशन मोडवर काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जिल्ह्यातील उपक्रमांची माहिती दिली.

लाभार्थ्यांना योजनांचा थेट आधार
‘सेवा संकल्प’च्या प्रारंभप्रसंगी विविध शासकीय योजनांच्या लाभांचे थेट वितरण करण्यात आले. संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेतील लाभार्थ्यांना मंजुरी आदेश आणि आर्थिक सहाय्य देण्यात आले. अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी अधिनियमांतर्गत शहापूर आणि भिवंडी तालुक्यातील पात्र वनहक्कधारकांना नवीन गाव नमुने आणि वनपट्टेही वितरित करण्यात आले.

विश्वकर्मा योजनेला चालना
पारंपरिक कारागिरांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यात ३६ हजार ७०४ अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी १४ हजार ९०० अर्ज पात्र ठरले आहेत. पात्र लाभार्थ्यांना प्रशिक्षण, टूलकिट आणि खेळत्या भांडवलाचा लाभ देण्यात येत आहे.

ठाणे : रुबल अग्रवाल यांच्या उपस्थितीत ‘सेवा संकल्प’ अभियानाचा प्रारंभ करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Pune Highway Traffic : ठाणे-मुंबईकडे जाणार्‍या वाहनांसाठी मोठी बातमी! महामार्ग पोलिसांकडून 'या' दिवशी अवजड वाहनांना प्रवेशबंदी, प्रवासाच्या नियोजनापूर्वी वाचा ही अपडेट

Central Railway: खोपोलीकरांसाठी लोकलला 'ब्रेक'! पळसदरी-खोपोलीदरम्यान दोन महिने विशेष ब्लॉक, पाहा वेळापत्रक

Crime News: धक्कादायक! चार वर्षीय चिमुकलीसोबत ८५ वर्षीय वृद्धाचे अश्लील कृत्य, डोंबिवलीत संतापाची लाट

Latest Marathi News Update : पहलगाम दहशतवादी हल्ला प्रकरणी आरोपी सैफुल्ला उर्फ ​​साजिद जट्ट याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

Raigad Teacher Recruitment: रायगड ZP शिक्षक भरतीत सहा तालुके पूर्णपणे वगळले; शून्य शिक्षकी शाळांचा प्रश्न अधिक गंभीर

SCROLL FOR NEXT