मुंबई

अतिरिक्त आयुक्तांचा ‘दर्जा’ बदलला!

CD

ठाणे, ता. १७ : महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तांच्या जबाबदाऱ्यांमध्ये अवघ्या काही दिवसांतच फेरबदल करण्यात आल्याने प्रशासकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आयुक्त सौरभ राव यांनी कामकाजाची विभागणी करीत प्रशांत रोडे यांच्याकडे अतिरिक्त आयुक्त-१, तर डॉ. नितीन राठोड यांच्याकडे अतिरिक्त आयुक्त-२ची जबाबदारी सोपविली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच डॉ. राठोड यांनी अतिरिक्त आयुक्त-१चा कार्यभार स्वीकारला होता. त्यामुळे अचानक करण्यात आलेल्या या फेरबदलामागे नेमके कारण काय, याबाबत पालिका वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

ठाणे महापालिकेच्या प्रशासकीय यंत्रणेतील महत्त्वाच्या अतिरिक्त आयुक्त पदावर राठोड यांची सरकारकडून नियुक्ती करण्यात आली होती. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मनीष जोशी ३१ ऑगस्टला सेवानिवृत्त झाल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. राज्याच्या नगरविकास विभागाने ४ सप्टेंबरला आदेश काढून डॉ. राठोड यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली. डॉ. राठोड हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातील विश्वासू अधिकारी म्हणून त्यांची एक ओळख आहे. त्यातूनच त्यांच्याकडे ठाणे महापालिकेतील महत्त्वाची वरिष्ठ प्रशासकीय जबाबदारी देण्यात आली असल्याचे बोलले जात आहे. डॉ. राठोड यांनी अतिरिक्त आयुक्त १ या पदाचा कार्यभार स्वीकारला होता. मात्र, अवघ्या काही दिवसांतच पालिका आयुक्त सौरभ राव यांनी आदेश काढीत महापालिकेच्या विविध विभागांचे कामकाज अधिक प्रभावीपणे पार पाडणे, प्रशासकीय निर्णयांची अंमलबजावणी गतिमान करणे आणि सर्व कामे विहित वेळेत पूर्ण होण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे.

विजांचा कडकडाट अन् वादळी वाऱ्याचा तडाखा! कोकण, विदर्भ, मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांत मुसळधारेचा इशारा

IND vs AFG 3rd T2OI: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच... श्रेयस अय्यरने Playing XI मध्ये केलाय एक बदल; जाणून घ्या संघ

72-Year-Old Paragliding : आजोबांनी Gen-Z लाही लाजवलं ! वयाच्या ७२व्या वर्षी घेतली आकाशात झेप, २४ हजार फूट उंचीवरून पॅराग्लायडिंग, VIDEO VIRAL

Latest Marathi News Update : नागपूरच्या अजनी चौकात ‘आशीर्वाद का दीया’ अभियान; दीपोत्सवाला मुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती

Lightning Strike Tragedy: सिल्लोडच्या दहिगावात शेतातील झोपडीवर वीज कोसळून पती-पत्नीचा मृत्यू, मुलगा गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT