मुंबई

नाले बुजवणाऱ्यांचा सॅटेलाइटद्वारे शोध घ्या..

CD

पालघर, ता. १७ (बातमीदार) : अतिवृष्टीच्या काळात नैसर्गिक नाले बुजवल्यामुळे पावसाचे पाणी साचून समस्या निर्माण झाल्या आहेत. जिल्ह्यात ढगफुटीसदृश पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती देताना नाईक यांनी उद्भवलेल्या समस्यांची गंभीर दखल घेत पालकमंत्री गणेश नाईक यांनी नाले बुजविणाऱ्या विकसकांसह संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. नैसर्गिक नाले बुजविणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी सॅटेलाइट चित्रीकरणाचा वापर करावा व संबंधितांना नाले खुले करण्याची संधी द्यावी. त्यानंतरही काम न झाल्यास कोणाचीही तमा न बाळगता थेट कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांना दिले. सेवा संकल्प अभियानाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी या सूचना दिल्या.

वन विभागाच्या दिरंगाईमुळे प्रकल्प रखडू नयेत
वन विभागाच्या दिरंगाईमुळे मोठ्या रस्ते प्रकल्पांना अडथळे निर्माण होत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. या प्रकरणांवर जलद गतीने कार्यवाही करून रखडलेली प्रकरणे मार्गी लावावीत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. जिल्ह्यातील विविध समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या असून, विकासकामे आणि नागरिकांच्या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असे नाईक यांनी सांगितले. या वेळी खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, उपवनसंरक्षक निरंजन दिवाकर, सैफुद्दीन शेख, उपजिल्हाधिकारी रणजीत देसाई यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. समस्या निर्माण होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune BJ Medical College: बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील ३१ अध्यापक पदकपातीतून अध्यापन व रुग्णसेवेवर गदा

Latest Marathi News Update : नागपूरच्या अजनी चौकात ‘आशीर्वाद का दीया’ अभियान; दीपोत्सवाला मुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती

Maratha Reservation Protest: जेवळीतील पाण्याच्या टाकीवर ‘शोले स्टाईल’ आंदोलन; उपोषण स्थगित तरी मराठा आरक्षणासाठी लढा कायम

विजांचा कडकडाट अन् वादळी वाऱ्याचा तडाखा! कोकण, विदर्भ, मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांत मुसळधारेचा इशारा

IND vs AFG 3rd T2OI: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच... श्रेयस अय्यरने Playing XI मध्ये केलाय एक बदल; जाणून घ्या संघ

SCROLL FOR NEXT