मुरबाड, ता. १८ (वार्ताहर) : ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहले खरेच धन्य ऐकतो मराठी, येथल्या मनामनात नांदते मराठी’ या उक्तीप्रमाणे मराठी भाषेचा महिमा आपण नेहमीच ऐकत असतो, मात्र सध्याच्या काळात ही मराठी भाषा जी आपली मातृभाषा आहे, ती मराठी आणि जिच्यामुळे आमच्या ओठावर मराठी भाषा रेंगाळायला लागली, ती मराठी शाळा वाचविणे आज काळाची गरज आहे. महाराष्ट्राची मराठमोळी संस्कृती, मराठी भाषा, मराठी परंपरा टिकविण्याचा सुंदर प्रयत्न ठाणे जिल्ह्यातील सह्याद्री डोंगराच्या खाली असलेल्या मुरबाड तालुक्यातील डेहनोली गावात सध्या गणेशोत्सवाच्या काळात पाहायला मिळत आहे. ‘मराठी शिकूया, मराठी जगूया, मराठी जपूया’ या ब्रीदवाक्याखाली प्रत्येक गावपाड्याचे प्राण असलेली सुंदर-सुबक-आकर्षक अशी मराठी शाळा गणपतीच्या आसनाला वेध घेत साकारली आहे. डेहनोली गावातील लक्ष्मण दगडू आगिवले यांच्या निवासस्थानी २९व्या वर्षाचा घरगुती गणेशोत्सव साजरा करत असताना ‘मराठी शाळा वाचवा, मराठी आपली अस्मिता’ या धर्तीखाली हा सुंदर देखावा तयार करण्यात आला आहे.
या गावातील सामाजिक युवा कार्यकर्ते दिगंबर आगिवले यांच्या संकल्पनेखाली हा सुंदर प्रबोधनात्मक देखावा तयार करण्यात आला आहे. महाराष्ट्र हा मराठी भाषिकांचे राज्य आहे. त्यामुळे इंग्रजी शिकताना मराठी भाषेला विसरू नका, मराठी शाळा टिकल्या पाहिजेत, जगल्या पाहिजेत, हा मोलाचा संदेश या देखाव्यातून मिळतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.