मुंबई

फोटो-व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : खासगी फोटो-व्हिडीओ कुटुंबीय व परिचितांना पाठवून व्हायरल करण्याची, तसेच बलात्काराची तक्रार करण्याची धमकी देत एका ५७ वर्षीय व्यावसायिकाकडून एका महिलेने एक कोटी ८० लाख रुपये उकळल्याचा आरोप करण्यात आला. याप्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार हे हिरानंदानी इस्टेट येथे राहतात. २०१८-१९ मध्ये फेसबुकच्या माध्यमातून रुपाली पाटील नावाच्या महिलेशी त्यांची ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री निर्माण झाली आणि संमतीने शारीरिक संबंध असल्याचे तक्रारदाराने सांगितले आहे. रुपालीने वैयक्तिक आर्थिक अडचणी, आईचे उपचार व अन्य कारणे सांगून सुरुवातीला त्यांच्याकडून चार ते पाच लाख रुपये घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे. सप्टेंबर २०२४ पासून कुटुंबीयांना संबंधांची माहिती देऊन बदनामी करण्याची तसेच आत्महत्या करण्याची धमकी देत पैशांची मागणी सुरू झाल्याचा आरोप तक्रारीत आहे.

नोव्हेंबर २०२४ ते मे २०२६ दरम्यान टप्प्याटप्प्याने सुमारे १ कोटी ६५ लाख रुपये आणि त्यानंतर आणखी १५ लाख रुपये दिल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. ऑगस्टमध्ये महिलेने पुन्हा फोटो-व्हिडीओ पाठवून दोन कोटींची मागणी केली. तडजोडीनंतर एक कोटी ७५ लाख रुपये देण्याचा तगादा सुरू असल्याचा आरोप केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palghar Relief Hospital case: रिलीफ रुग्णालय राडा प्रकरणात कुंदन संखे यांच्यासह २२ जणांना न्यायालयीन कोठडी; पोलिसांची अतिरिक्त पोलीस कोठडीची मागणी फेटाळली

Sugar Factory Membership: कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादकांना सभासदत्व बंद; साखर आयुक्तांच्या परिपत्रकामुळे भीमाशंकर कारखान्याच्या प्रस्तावाला ब्रेक

MNLU Nagpur VC Appointment: डॉ. ज्योती भाकरे यांची नागपूरच्या 'महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी'च्या (MNLU) कुलगुरूपदी निवड

राहुल द्रविडच्या पोराची २११ च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी,ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची धुलाई! आर्यवीर सेहवागच्या पदार्पणात २८ धावा

MIDC Land Acquisition: महागावात एमआयडीसी भूसंपादन सर्वेक्षणाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध; मोजणी थांबवावी लागली

SCROLL FOR NEXT