मुंबई

अनधिकृत फलकांचा सुळसुळाट

CD

अनधिकृत फलकांचा सुळसुळाट
दृश्य अडथळ्यांमुळे वाहतुकीची सुरक्षितता धोक्यात
जुईनगर, ता. १८ (बातमीदार) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील चौक, रस्त्यांचे दुभाजक आणि सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत बॅनर व फ्लेक्स लावण्याचे प्रमाण वाढले आहे. मोठमोठे फलक रस्त्यांच्या वळणांवर तसेच दुभाजकांवर उभारण्यात आल्याने वाहनचालकांना अडथळे येत आहेत. त्यामुळे शहराचे विद्रूपीकरण होण्याबरोबरच समोरून येणारी वाहने, पादचारी आणि दुचाकीस्वार वेळेत न दिसल्यास अपघाताचा धोका घडण्याची शक्यता आहे.
गणेशोत्सवापूर्वी महापालिकेने गणेश मंडळांना नियमानुसार परवानगी घेऊनच होर्डिंग आणि बॅनर लावण्याच्या सूचना केल्या होत्या. अनधिकृत फलकांवर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले होते. प्रत्यक्षात मात्र अनेक प्रमुख रस्त्यांवर फलक कायम असल्याचे चित्र आहे. गतवर्षीही उत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात झालेल्या फलकबाजीमुळे शहर विद्रूपीकरणासह महापालिकेच्या संभाव्य जाहिरात उत्पन्नाचा मुद्दा उपस्थित झाला होता. एकीकडे फेरीवाले आणि किरकोळ अतिक्रमणांवर तत्परतेने कारवाई केली जात असताना सार्वजनिक जागा व्यापणाऱ्या फलकांवर कारवाई कधी होणार, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.

बॅनर हटविण्याची मागणी
गणेशोत्सव काळात रस्त्यांवर वाहनांची आणि भाविकांची वर्दळ वाढते. अशा वेळी चौक, वळण आणि रस्त्यांच्या जोडणीजवळील फलकांमुळे दृश्यमानता कमी होणे धोकादायक ठरू शकते. महापालिकेने यापूर्वी मुख्य रस्ते, पदपथ आणि रेल्वे स्थानक परिसर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी विशेष मोहीम राबवली होती. पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा या कारवाईत महत्त्वाचा होता. त्यामुळे छोट्या स्वरूपातील अतिक्रमणांप्रमाणेच मोठ्या अनधिकृत फलकांवरही कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. फेरीवाल्यांचे अतिक्रमण दिसते; मग बॅनरचे अतिक्रमण का दिसत नाही, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nandigram Bypoll : पश्चिम बंगालमधील नंदीग्राम पोटनिवडणुकीआधी मोठा ट्विस्ट; ममता बॅनर्जींच्या उमेदवाराची अचानक माघार, नेमकं काय घडलं?

LP Gas Tanker Accident: वाडाखडकोना येथे एलपी गॅस टँकर कलंडला; गळती न झाल्याने मोठा अनर्थ टळला

Festival Makeup Skin Care: सणासुदीला मेकअपमुळे त्वचा बिघडतेय? १० मिनिटांत करा ‘हा’ घरगुती राइस जेल; चेहरा दिसेल फ्रेश

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

Pali Stray Dogs: पालीत भटक्या कुत्र्यांचा कहर; १० वर्षांच्या चिमुरडीसह भाविक महिलेला चावा

SCROLL FOR NEXT