पडघा, ता. १८ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील पडघा व परिसरातील नागरिकांना पतपुरवठा करण्यासाठी अग्रेसर असलेल्या गिरीराज ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली.
९९९ सभासद संख्या व ६७ लाख रुपये भागभांडवल असलेल्या गिरीराज पतसंस्थेची ३०वी वार्षिक सभा अमोल बिडवी यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयांसंदर्भात ग्रामसचिवालय सभागृहात बुधवारी (ता. १६) घेण्यात आली. या वेळी पतसंस्थेचे संचालक अमित बिडवी यांना सभेचा अजेंडा मिळाला नसल्याचा व सभेबद्दल काहीच माहिती नसल्याने ही सभा बेकायदा असल्याचे सांगून सभा रोखून धरली होती. नंतर संचालक मंडळाने त्यांची समजूत काढून दिलगिरी व्यक्त केली. या वेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अहवालात त्यांना अभिवादन करण्यासाठी फोटो छापण्याची मागणी सभासदांनी केली तर मागणी केलेली दैनंदिन ठेव पैसे कपात मुदत सहा महिने कमी करून चार महिने करण्यात आली, तर या वेळी ताळेबंद पत्रक, जमा खर्च, अंदाजपत्रक, भागधारक संख्या वाढवणे, घसारा, संशयित बुडीत कर्ज, संचालक व त्यांच्या कुटुंबीयांना दिलेले कर्ज, बँकिंग तज्ज्ञ संचालक नेमणूक, सामाजिक उपक्रम, इमारत निधीबाबत सभासदांनी प्रश्न उपस्थित केले यावर सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात आले.
या वेळी उपाध्यक्ष गिरीश पटेल, सचिव दिनेश गंधे, संचालक प्रवीण बिडवी, अमित बिडवी, संजय बिडवी, ॲड. अजित कराडकर, रावसाहेब कुमावत, स्नेहा तांबोळी, आंकाक्षा पातकर, संतोष काळे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.