मुंबई

कासारवडवलीत तीन व्यक्ती बेपत्ता

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : कासारवडवली परिसरातील वेगवेगळ्या घटनांमध्ये २६ वर्षीय तरुणीसह दोन पुरुष बेपत्ता झाल्याप्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले. घरातून कामानिमित्त बाहेर पडलेले तिघेही परत न आल्याने कुटुंबीयांनी अपहरण झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. पोलिसांकडून तिघांचा शोध सुरू आहे.

कासारवडवली, घोडबंदर रोड परिसरातील २६ वर्षीय तरुणी ही मंगळवारी (ता. १५) सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास व्यवस्थापकाला घरी जात असल्याचे सांगून निघाली; मात्र ती घरी पोहोचली नाही. रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास फोन केला असता तिचा मोबाईल बंद होता. नातेवाईक, मित्र आणि परिसरात शोध घेऊनही ती न सापडल्याने कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली.

दुसऱ्या घटनेत सुनील राठोड (वय २८) हे शनिवारी (ता. १२) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास रात्रपाळीच्या कामासाठी घरातून निघाले; मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी ते घरी परतले नाहीत. कामाच्या ठिकाणी चौकशी केली असता ते तेथे गेलेच नसल्याचे समोर आले. त्यानंतर कुटुंबीयांनी शोध घेतला; मात्र ते आढळले नाहीत. तिसऱ्या घटनेत संजय मोर्या (वय ४८) हे मंगळवारी (ता. १५) सकाळी ११ वाजता वरळी येथे जात असल्याचे सांगून घरातून निघाले. रात्री १०पर्यंत ते घरी न परतल्याने पत्नीने फोन केला; मात्र त्यांचा मोबाईल बंद होता. नातेवाईक व मित्रांकडे चौकशी करूनही त्यांचा ठावठिकाणा लागला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Dare Village : गावी आलो किंवा लंडनला गेलो तरी पोटदुखी, “ विरोधकांना कामातून उत्तर देईन”,एकनाथ शिंदेंनी दरेतून साधला निशाणा

रोहित शर्माचा Mumbai Indians मधील 'सहकारी' Ajit Agarkar ची जागा घेणार; आता हिटमॅन २०२७ चा वर्ल्ड कप खेळणारच...

सगळं सोडून द्यायचा विचार होता पण...; सुटकेनंतर संतोष पंडित काय म्हणाले? तुरुंगातल्या व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

Panvel News: पनवेलमध्ये वाहतुकीत मोठे बदल! गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांसाठी प्रशासनाचे कडक पाऊल

SCROLL FOR NEXT