मुंबई

आनंद चंदावरकर हॉस्पिटलचा तेरावा वर्धापन दिन संपन्न

CD

आनंद चंदावरकर हॉस्पिटलचा १३वा वर्धापन दिन साजरा

मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

वाडा, ता. १८ (बातमीदार) : वाडा तालुक्याच्या ग्रामीण भागात उत्तम आरोग्यसेवा देणाऱ्या आनंद चंदावरकर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आणि कल्याणी मेडिकल रिसर्च सेंटर खुपरी यांचा १३वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सर्व अत्याधुनिक सुविधांनी सज्ज व कमीत कमी दरात आरोग्यसेवा देणारे हॉस्पिटल म्हणून या हॉस्पिटलची ओळख आहे. वर्धापन दिनानिमित्त अनेक मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली.
मोफत आरोग्य तपासणीमध्ये स्त्री रोग, दंत चिकित्सा, नेत्रतपासणी, जनरल सर्जरी, फिजिओथेरपी, हाडांची तपासणी, एक्स रे, ई सी जी आदी आजराबाबत तपासणी तथा मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी जनरल सर्जरी तज्ज्ञ डॉ. वैभव ठाकरे, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. उज्ज्वला ठाकरे, डॉ. सानिया भोईर, ऑर्थोलॉजिस्ट डॉ. जिग्नेश सिंग, जनरल तपासणी डॉ. अविनाश पाटील, डॉ. योगेश नारखडे, दंत तपासणी तज्ज्ञ डॉ.भावना देशमुख, नेत्र तपासणी तज्ज्ञ डॉ. अग्रवाल, डॉ. कल्पेश पष्टे आदींनी सेवा दिली. १३ वर्षांत रुग्णांनी, हितचिंतकांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल डॉ. वैभव ठाकरे यांनी धन्यवाद व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar crime control: दहशत माजवणाऱ्या संदिप फटाकडेला छ. संभाजीनगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार

Marathi News Live Updates : माढ्यात सीना नदीत ५ तरुण बुडाले

Sugarcane Mechanization: ऊसतोड मजुरांच्या मनमानीला कंटाळून शेतकऱ्यांचा यंत्रांकडे मोर्चा; आधुनिक हार्वेस्टरमुळे वेळ व खर्चात बचत

Banjara ST reservation protest: येलदरी जलाशयात बंजारा समाजाचे जलसमाधी आंदोलन; विनोद आडे यांच्या आमरण उपोषणाला व्यापक पाठिंबा

Manwat Health Services Review: सुट्टीच्या दिवशी आरोग्य सुविधांची तपासणी; महालक्ष्मी सणात महिला कर्मचाऱ्यांची ड्युटीमुळे तारांबळ

SCROLL FOR NEXT