मुंबई

भाडे भरूनही सुविधांचा बोजवारा!

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : महापालिकेच्या रेंटल हाउसिंग इमारतींमध्ये राहणाऱ्या बाधित कुटुंबांना घर मिळाले; मात्र घरासोबत समस्यांचे ‘पॅकेज’च मिळाल्याची स्थिती आहे. दरमहा अवघ्या दोन हजारांचे भाडे वसूल करणाऱ्या महापालिकेच्या या इमारतींमध्ये ड्रेनेज तुंबणे, पावसाचे पाणी झिरपणे, लिफ्ट बंद पडणे आणि कचरा साचणे या समस्यांनी रहिवाशांचा जीव मेटाकुटीला आला आहे. तक्रारी करूनही प्रश्न सुटत नसल्याने रेंटलच्या नावाखाली रहिवाशांना गैरसोयींचे घर तर दिले नाही ना, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

प्रकल्पबाधित, रस्ता रुंदीकरणबाधित तसेच धोकादायक इमारतींमधील कुटुंबांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यासाठी शहरात रेंटल हाउसिंग इमारती उभारण्यात आल्या. सध्या १० ठिकाणी रेंटल इमारती असून, त्यामध्ये मोठ्या संख्येने कुटुंबे वास्तव्यास आहेत. मात्र, या इमारतींच्या नियमित देखभाल-दुरुस्तीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे तक्रारींवरून दिसून येत आहे. वर्तकनगर, नौपाडा, खोपट, मानपाडा, बाळकुम, भाईंदरपाडा, खेवरा सर्कल, मुंब्रा आणि हाजुरी येथील रेंटल इमारतींमध्ये विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. ड्रेनेजची कामे रखडणे, पावसाळ्यात भिंती व छतांमधून पाणी झिरपणे, लिफ्ट वारंवार बंद पडणे, जिने व पॅसेजमध्ये कचरा साचणे यामुळे रहिवाशांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे.

विशेषतः लिफ्ट बंद पडल्याचा फटका ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले आणि दिव्यांगांना बसत आहे. अनेक मजल्यांची इमारत असताना लिफ्टच बंद असेल, तर रहिवाशांनी रोज जिने चढ-उतरणे किती दिवस सहन करायचे, असा संतप्त सवाल केला जात आहे. दुसरीकडे, ड्रेनेजच्या समस्येमुळे दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी आहेत.

चार कोटींवरून तरतूद थेट एक कोटीवर!
रेंटल इमारतींच्या दुरुस्तीचा प्रश्न गंभीर असताना अर्थसंकल्पीय तरतुदीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापूर्वी रेंटल इमारतींच्या दुरुस्तीसाठी सुमारे चार कोटींची तरतूद करण्यात आली होती. मात्र, सध्या संबंधित लेखाशीर्षाखाली एक कोटीची तरतूद असल्याचे अर्थसंकल्पीय आकडेवारीतून दिसते. एकीकडे इमारतींच्या तक्रारी वाढत असताना दुरुस्तीचा निधी कमी होत असेल, तर समस्या सुटणार कशा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

भाडे वेळेवर, मग सुविधा का नाहीत?
ठाणे पालिका रहिवाशांकडून नियमित भाडे आकारते. त्या बदल्यात सुरक्षित, स्वच्छ आणि मूलभूत सुविधांनी युक्त निवासाची अपेक्षा स्वाभाविक आहे. मात्र, तक्रारींचा वाढता पाढा पाहता भाडे वसुलीत तत्परता आणि देखभालीत चालढकल अशी स्थिती निर्माण झाली आहे का, याबाबत महापालिकेने तपासणी करण्याची गरज आहे.

संयुक्त पाहणीची मागणी
सर्व दहा रेंटल इमारतींची तातडीने संयुक्त पाहणी करून इमारतनिहाय दोष, दुरुस्तीचा खर्च, उपलब्ध निधी आणि काम पूर्ण करण्याची अंतिम मुदत निश्चित करावी. रहिवाशांच्या तक्रारींचे कागदी निवारण न करता प्रत्यक्ष कामे करून दाखवावीत, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Dare Village : गावी आलो किंवा लंडनला गेलो तरी पोटदुखी, “ विरोधकांना कामातून उत्तर देईन”,एकनाथ शिंदेंनी दरेतून साधला निशाणा

रोहित शर्माचा Mumbai Indians मधील 'सहकारी' Ajit Agarkar ची जागा घेणार; आता हिटमॅन २०२७ चा वर्ल्ड कप खेळणारच...

सगळं सोडून द्यायचा विचार होता पण...; सुटकेनंतर संतोष पंडित काय म्हणाले? तुरुंगातल्या व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

Panvel News: पनवेलमध्ये वाहतुकीत मोठे बदल! गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांसाठी प्रशासनाचे कडक पाऊल

SCROLL FOR NEXT