भिवंडी, ता. १८ (वार्ताहर) : तालुक्यातील मौजे खारबाव ग्रामपंचायतीच्या विविध कामकाजाबाबत ग्रामस्थांनी गंभीर आक्षेप उपस्थित करत संपूर्ण कारभाराची सखोल व निष्पक्ष चौकशीची मागणी गटविकास अधिकाऱ्यांसह संबंधित अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे.
ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार, १३ ऑगस्टला आयोजित ग्रामसभा आवश्यक गणसंख्या पूर्ण न झाल्यामुळे तहकूब करण्यात आली होती. त्यानंतर २० ऑगस्टला तहकूब ग्रामसभा आयोजित करण्यात आली. या सभेच्या अजेंड्यावर २०२६-२७च्या ग्रामपंचायत विकास आराखडा मंजुरीचा विषय ठेवण्यात आला होता, मात्र ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार विकास आराखडा ग्रामसभेत मंजूर होण्यापूर्वीच १३ ऑगस्टला ‘ई-ग्रामस्वराज’ या पोर्टलवर अपलोड करण्यात आल्याचा आरोप आहे. दरम्यान, या प्रकरणाबाबत ग्रामस्थांनी स्पष्टीकरणाची मागणी केली असून, ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी सामाजिक माध्यमावर प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये विकास आराखडा मासिक सभेत मंजूर केल्याचा दावा केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या दाव्याची सत्यता व त्यामागील प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय १५वा वित्त आयोग निधी, विविध खरेदी व कामांवरील खर्च, एकाच कामावर वारंवार खर्च दाखविणे, सार्वजनिक विहिरींच्या साफसफाईचा खर्च, जनसुविधा योजनेंतर्गत स्मशानभूमी शेडचे काम, तसेच मागासवर्गीय व महिला-बालकल्याणासाठी करण्यात आलेल्या खर्चाची सखोल चौकशी करावी तसेच या संपूर्ण प्रकरणाची दखल घेऊन गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे तसेच ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य ती प्रशासकीय चौकशी करून ग्रामस्थांना वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी केली आहे.
ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता राहावी, ग्रामसभेच्या प्रक्रियेचे पालन व्हावे आणि ग्रामस्थांच्या प्रश्नांना अधिकृत उत्तरे मिळावीत, यासाठी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे, अशी भूमिका ॲड. दीप्ती काठे तसेच युवा सामाजिक सेवा मंडळ यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.