कल्याण, ता. १८ (वार्ताहर) : राज्य सरकारकडून सार्वजनिक आरोग्य सुविधांसाठी अर्थसंकल्पात तरतूद केली जात असतानाही कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील नागरिकांना पुरेशा आणि मोफत आरोग्य सुविधा मिळत नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेतील नियोजनाचा अभाव दूर करून नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नोवेल साळवे यांनी केली आहे.
कल्याण पश्चिमेतील रुक्मिणीबाई रुग्णालयाची दुरवस्था झाल्याचा दावा करण्यात आला असून, दुसरीकडे गौरीपाडा येथे प्रस्तावित असलेल्या १०० खाटांच्या रुग्णालयाचे कामही रखडल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना उपचारासाठी खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत असल्याने आर्थिक भार वाढत असल्याचे साळवे यांचे म्हणणे आहे.
कल्याण शहरालगत असलेल्या उल्हासनगर येथील शासकीय जिल्हा मध्यवर्ती रुग्णालयाचीही स्थिती सुधारण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. परिसरातील नागरिकांना शासकीय आरोग्यसेवांचा लाभ स्थानिक पातळीवर मिळणे आवश्यक असून, उपचारांसाठी मुंबईसारख्या शहरांकडे धाव घेण्याची वेळ नागरिकांवर येऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. दरम्यान, राज्य सरकार आणि महापालिकेच्या अर्थसंकल्पात आरोग्य सुविधांसाठी निधीची तरतूद केली जाते, मात्र या निधीतून नागरिकांना प्रत्यक्षात कितपत सुविधा मिळतात, याचे प्रभावी नियोजन आणि देखरेख आवश्यक आहे.
‘रुक्मिणीबाई’ला उपजिल्हा मध्यवर्तीचा दर्जा द्यावा
रुक्मिणीबाई रुग्णालय राज्य सरकारने ताब्यात घेऊन त्याला उपजिल्हा मध्यवर्ती रुग्णालयाचा दर्जा द्यावा, तसेच महापालिका क्षेत्रातील शासकीय आरोग्य केंद्रे आणि रुग्णालयांमध्ये नागरिकांना अधिक व्यापक व परवडणाऱ्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही साळवे यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.