मुंबई

पाकिस्तानात राहून आलेला तरूण अटकेत

CD

पाकिस्तानात राहून आलेल्या
तरुणाला मलंगगडावर बेड्या
पाकिस्तानी पासपोर्ट काढल्याचे उघड; हिललाइन पोलिसांसह मुंबई एटीएसकडून तपास

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १८ : पाकिस्तानात वास्तव्य करून बनावट नावाने पाकिस्तानी पासपोर्ट काढून त्याच आधारे भारतात परतलेल्या एका भारतीय तरुणाला हिललाइन पोलिसांनी मलंगगड परिसरातून ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी कारवाई करीत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता मुंबई एटीएसकडूनही याचा स्वतंत्र तपास सुरू करण्यात आला आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाची ओळख अद्याप जाहीर केलेली नसून, त्याचा जन्म मलंगगड परिसरात झाला असल्याचे चौकशीत उघड झाले. काही वर्षांपूर्वी तो भारतीय पासपोर्टवर पाकिस्तानात नातेवाइकांकडे गेला होता. तेथे त्याने सुमारे चार ते पाच वर्षे वास्तव्य केले. याच काळात त्याने भारतीय पासपोर्ट नष्ट करून कथितरीत्या बनावट नावाने पाकिस्तानी पासपोर्ट मिळविला. या पाकिस्तानी पासपोर्टवर तो भारतात परतला. त्यानंतर पुन्हा भारतीय पासपोर्ट मिळविण्यासाठी त्याने अर्ज केला; मात्र त्याचा पूर्वीचा प्रवास आणि पाकिस्तानी पासपोर्टची माहिती पासपोर्ट विभागाच्या निदर्शनास आली. विभागाने याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर हिललाइन पोलिसांनी ही कारवाई केली. दोन-तीन दिवसांपूर्वी पोलिसांनी त्याला मलंगगडावरून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. पोलिसांनी सध्या एफआयआर, कागदपत्रे आणि आरोपीची ओळख जाहीर करण्यास नकार दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : विमान हवेत असताना दोन प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Latur Crop Loss: निलंगा तालुक्यात खरीप पीक शंभर टक्के उद्ध्वस्त; कृषी विभागाच्या ‘७० टक्के’ अहवालावर शेतकऱ्यांचा संताप

Sahyadri Sugar Mill: सह्याद्री साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; घोषणाबाजी, गदारोळ आणि तणावपूर्ण वातावरण

Malegaon Tractor Attack Case: माळेगावात ट्रॅक्टरने जीवे मारण्याचा प्रयत्न; नरूटे कुटुंबीयांवर हल्ला, पाच जणांविरुद्ध गुन्हा

Nandigram Bypoll : नंदीग्राम पोटनिवडणुकीआधी मोठी घडामोड; काँग्रेस उमेदवार मिलन प्रधान यांच्यानंतर पक्षातील बड्या नेत्यालाही अटक

SCROLL FOR NEXT