मुंबई

टाटा सन्सच्या शेअर बाजारातील नोंदणीला एसपी समूहाचा पाठिंबा

CD

टाटा सन्सच्या शेअर बाजारातील नोंदणीला एसपी समूहाचा पाठिंबा

नवी दिल्ली, ता. १८ : टाटा समूहाची होल्डिंग कंपनी असलेल्या टाटा सन्सच्या प्रस्तावित शेअर बाजारातील नोंदणीला (लिस्टिंग) कंपनीचे दुसरे मोठे भागधारक शापूरजी पालनजी (एसपी) समूहाने पाठिंबा दिला आहे. एसपी समूहाचा टाटा सन्समध्ये सुमारे १८.४ टक्के हिस्सा आहे.

टाटा सन्सची शेअर बाजारातील नोंदणी ही केवळ आर्थिक किंवा नियामक बाब नसून पारदर्शकता आणि सार्वजनिक उत्तरदायित्व वाढविण्याची संधी असल्याचे एसपी समूहाचे अध्यक्ष शापूर मिस्त्री यांनी म्हटले आहे. नोंदणीमुळे टाटा ट्रस्टची परोपकारी भूमिका कायम ठेवत कंपनीच्या कारभारात अधिक पारदर्शकता आणता येईल, असे त्यांनी नमूद केले.

भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) ११ सप्टेंबरला टाटा सन्सचा ‘अपर लेअर’ एनबीएफसी म्हणून असलेला दर्जा संपविण्याचा अर्ज फेटाळला. तसेच, या श्रेणीतील एनबीएफसीला लागू असलेल्या नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले. या नियमांनुसार टाटा सन्सला शेअर बाजारात सूचीबद्ध होणे अपेक्षित आहे.

टाटा ट्रस्टकडे टाटा सन्समध्ये सुमारे ६६ टक्के हिस्सा असून, त्यांनी नोंदणीला विरोध केला आहे. एसपी समूहाला तरलता उपलब्ध करून देण्यासाठी किमान २५ हजार कोटी रुपयांच्या व्यवहाराचा पर्याय ट्रस्टने सुचविला आहे. टाटा सन्सच्या संचालक मंडळाने शेअर बाजारात नोंदणीच्या दिशेने पुढे जाण्याची भूमिका घेतली आहे. मिस्त्री यांनी टाटा समूह, ट्रस्ट, भागधारक आणि कर्मचाऱ्यांनी समन्वयाने या विषयाकडे पाहण्याचे आवाहन केले. नोंदणीचा उद्देश कोणत्याही एका बाजूचा विजय नसून अधिक मजबूत संस्था, पारदर्शकता आणि परोपकारासाठी अधिक संसाधने उपलब्ध करून देणे हा असावा, असे त्यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nandigram Bypoll : नंदीग्राम पोटनिवडणुकीआधी मोठी घडामोड; काँग्रेस उमेदवार मिलन प्रधान यांच्यानंतर पक्षातील बड्या नेत्यालाही अटक

Pune University Mess Fee Hike: पुणे विद्यापीठातील मेस दरवाढीचा भार विद्यार्थ्यांवर नको; विद्यापीठाने अनुदान द्यावे: ‘विद्यार्थी संघर्ष कृती समिती’ची मागणी

Chhatrapati Sambhajinagar crime control: दहशत माजवणाऱ्या संदिप फटाकडेला छ. संभाजीनगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार

Marathi News Live Updates : बुलढाण्यात कंटेनर-दुचाकीचा भीषण अपघात; मायलेकाचा जागीच मृत्यू

Sugarcane Mechanization: ऊसतोड मजुरांच्या मनमानीला कंटाळून शेतकऱ्यांचा यंत्रांकडे मोर्चा; आधुनिक हार्वेस्टरमुळे वेळ व खर्चात बचत

SCROLL FOR NEXT