मुंबई

मराठा आरक्षणावर पुन्हा नव्याने सुनावणी

CD

मराठा आरक्षणावर पुन्हा नव्याने सुनावणी

न्या. मकरंद कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली नवे पूर्णपीठ स्थापन

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात मराठा समाजाला दहा टक्के आरक्षणाच्या समर्थनार्थ आणि विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवरील सुनावणीसाठी न्या. मकरंद कर्णिक, न्या. निजामुद्दीन जमादार आणि न्या. संदीप मारणे यांचे नवे पूर्णपीठ स्थापन करण्यात आले आहे. या नव्या पूर्णपीठापुढे येत्या ९ ऑक्टोबरपासून प्रकरणावर पुन्हा नव्याने सुनावणी सुरू होणार आहे.

कोलकता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तिपदी नियुक्ती होण्यापूर्वी न्या. रवींद्र घुगे, न्या. जमादार आणि न्या. मारणे यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणाची जवळपास गेल्या वर्षभरापासून नियमित सुनावणी सुरू होती. याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर राज्य सरकारकडून राज्याचे महाधिवक्ता मिलिंद साठ्ये यांचा युक्तिवाद सुरू होता. तथापि, न्या. घुगे यांची कोलकता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तिपदी नियुक्ती झाल्याने नियमानुसार प्रकरणाची पूर्णपणे नव्याने सुनावणी सुरू होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रकरणाच्या नव्याने होणाऱ्या सुनावणीसाठी न्यायमूर्ती कर्णिक यांच्या अध्यक्षतेखालील नवे पूर्णपीठ स्थापन करण्यात आले. या नव्या पूर्णपीठापुढे शुक्रवारी प्रकरणाची पहिली सुनावणी पार पडली. त्या वेळी आरक्षणाला विरोध करणारे याचिकाकर्ते संजीत शुक्ला यांच्या वतीने वरिष्ठ वकील प्रदीप संचेती यांनी या याचिकांवरील नव्याने सुनावणीची ही तिसरी वेळ असल्याचे न्यायालयाला सांगितले. यापूर्वी तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखालील पूर्णपीठापुढे प्रकरणाची सुनावणी झाली; परंतु त्यांची दिल्ली उच्च न्यायालयात बदली झाल्यानंतर आणि मराठा नेते मनोज जरांगे यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये मुंबईत केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर न्या. घुगे यांच्या अध्यक्षतेखालील पूर्णपीठ प्रकरणाच्या सुनावणीसाठी स्थापन करण्यात आले होते. या पूर्णपीठापुढे गेल्या वर्षभरापासून नियमित सुनावणी सुरू होती.

प्रकरण निकाली काढण्याचीही विनंती
न्या. घुगे यांचीही कोलकता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तिपदी नियुक्ती झाल्याने आता या पूर्णपीठापुढे प्रकरणाची नव्याने सुनावणी होत आहे, असे वरिष्ठ वकील प्रदीप संचेती यांनी न्यायमूर्ती कर्णिक यांच्या अध्यक्षतेखालील पूर्णपीठाला सांगितले. त्यानंतर, त्यांनी प्रकरणाची दररोज आणि अतिरिक्त वेळ सुनावणी घेऊन प्रकरण निकाली काढण्याचीही विनंती केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT