मुंबई

स्वस्त साखरेचा लाभ सर्वसामान्यांना कधी?

CD

स्वस्त साखरेपासून सर्वसामान्य दूरच!

उद्याेगांना दिलासा; साठवणूक मर्यादा दुप्पट

सकाळ न्यूज नेटवर्क
वी दिल्ली, ता. १८ : सणासुदीच्या काळात साखरेची मागणी वाढण्याची शक्यता असताना केंद्र सरकारने उद्याेगांना ३० दिवसांच्या गरजेइतकी साखर साठवण्याची परवानगी दिली आहे. त्याचवेळी ऑगस्टमधील साखरेचे किरकाेळ भाव प्रतिकिलो ६५ रुपयांवरून ५८.५० रुपयांपर्यंतच कमी झाले आहेत; मात्र घाऊक किमती सुमारे २५ टक्क्यांनी घटूनही अपेक्षित लाभ किरकोळ ग्राहकांना मिळालेला नसल्याने व्यापारी आणि विक्रेत्यांनी कमी झालेल्या किमतीचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे.

केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात साखर वापरणाऱ्या उद्योगांना यापूर्वी ही मर्यादा १५ दिवस एवढी होती; मात्र १५ दिवसांपेक्षा अधिक साठा करण्यासाठी संबंधित साखर केवळ आयातीच्या माध्यमातून उपलब्ध झालेली असणे आवश्यक आहे. अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने आज याबाबत माहिती दिली आहे. दरमहा १० टनांपेक्षा जास्त साखरेचा वापर उत्पादन, प्रक्रिया किंवा अन्य औद्योगिक कारणांसाठी करणाऱ्या मोठ्या ग्राहकांना हा निर्णय लागू होणार आहे. १५ दिवसांच्या मर्यादेपेक्षा अधिक साठा केवळ ‘टेरिफ रेट कोटा’ (टीआरक्यू) किंवा ‘ॲडव्हान्स ऑथरायझेशन स्कीम’ (एएएस) अंतर्गत आयात केलेल्या साखरेतूनच करता येईल. खुल्या बाजारातून खरेदी केलेल्या साखरेचा साठा १५ दिवसांच्या वापरापुरताच मर्यादित राहणार आहे.
दरम्यान, साखरेच्या कारखाना पातळीवरील किमतीत सुमारे २५ टक्क्यांनी घट झाली आहे; मात्र किरकोळ बाजारातील दर ऑगस्टमधील प्रतिकिलो ६५ रुपयांवरून सुमारे ५८.५० रुपयांपर्यंत घसरले आहेत. घाऊक दरातील घसरणीचा पूर्ण लाभ त्यामुळे ग्राहकांपर्यंत पोहोचलेला नसल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.

साठ्याची माहिती द्यावी
केंद्र सरकारने यापूर्वी ‘टीआरक्यू’अंतर्गत १० लाख टन साखर आयातीला परवानगी दिली आहे. तसेच ‘एएएस’अंतर्गत निर्यातीसाठी राखून ठेवलेल्या साखरेची देशांतर्गत विक्री करण्यासही परवानगी देण्यात आली आहे. साखरेच्या साठ्यावर लक्ष ठेवण्यासाठी मोठ्या ग्राहकांना दर शुक्रवारी अन्न मंत्रालयाच्या foodstock.dfpd.gov.in या संकेतस्थळावर साठ्याची माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

सरकारचे लक्ष राहणार
‘‘१ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नव्या साखर हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ३६५ रुपये रास्त व किफायतशीर दर (एफआरपी) मिळणार असून, सणासुदीच्या काळात साखरेचा पुरवठा आणि किमतीवर सरकारचे बारकाईने लक्ष राहील. गरजेनुसार पुढील उपाययोजना केल्या जातील,’’ असेही सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT