भिवंडी, ता. २० (बातमीदार) : भिवंडीत चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नारपोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत १५ सप्टेंबरला घडलेल्या दोन स्वतंत्र घटनांमध्ये दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी मोबाईल हिसकावून नेला, तर कशेळी येथील घरातून दोन महागडे मोबाईल व लॅपटॉप लंपास केला. ऐन सणासुदीच्या काळात घडलेल्या या घटनांमुळे पोलिसांच्या गस्तीसह सुरक्षाव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
पहिली घटना १५ सप्टेंबरला रात्री अकराच्या सुमारास बॉम्बे ढाब्यापुढे, दिवा गावाजवळील महामार्गावर घडली. डोंबिवली पश्चिम येथील वितेश बोरसे (वय २४) हे बुद्धिबळ प्रशिक्षक असून रिक्षाने घरी जात होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांचा ४० हजार रुपये किमतीचा आयफोन १५ हिसकावून पळ काढला. नारपोली पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे. दुसरी घटना कशेळी येथील सुधाकेशव अपार्टमेंटमध्ये पहाटे दोन ते सकाळी सातच्या दरम्यान घडली. मयुरी मोहिते (वय ५३) या कुटुंबीयांसह घरात झोपल्या होत्या. घराच्या दरवाजाला आतून कडी लावायची राहिल्याने तो उघडा राहिला होता. याचा फायदा घेत चोरट्याने घरात प्रवेश करून ५० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल चोरून नेले. तसेच लॅपटॉप चोरीला गेल्याचीही तक्रार करण्यात आली आहे. दोन्ही घटनांप्रकरणी नारपोली पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून आरोपींचा शोध घेण्याबरोबरच चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.