गणरायाच्या चरणी हिंदू-मुस्लिम ऐक्य
३३ फुटी ‘साकीनाक्याचा विघ्नहर्ता’; डीजे, गुलालाला फाटा देत पारंपरिक उत्सव
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : मुंबईसह सर्वत्रच गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होत असून, सार्वजनिक मंडळांनी आकर्षक देखावे, सजावटी करत भक्तांचे लक्ष आकर्षित करून घेत असले तरी साकिनाका येथील श्रीकृष्ण मंडळ त्याला अपवाद आहे. या मंडळाने तब्बल ३३ फूट उंचीचा ‘साकीनाक्याचा विघ्नहर्ता’ विराजमान केला असून, या गणपतीच्या माध्यमातून सामाजिक आणि धार्मिक एकोपा जपला जात आहे. येथे हिंदू धर्मीयांच्या खांद्याला खांदा लावून मुस्लिम बांधवही गणरायाची सेवा करत आहेत. हीच या गणरायाची वेगळी ओळख ठरली आहे.
श्री कृष्ण मंडळाची यंदाची ३३ फूट उंच आकर्षक मूर्ती प्रसिद्ध मूर्तिकार सिद्धेश दिगोळे यांनी साकारली आहे. भव्यता, भक्ती आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम असलेला या मंडळाकडून अध्यक्ष चंद्रकांत माने यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, आरोग्य शिबिर असे विविध उपक्रम राबविले जात आहेत. दरवर्षी आकर्षक मूर्ती साकारली जात असल्याने उपनगरातील गोड गणपती म्हणूनही या गणपतीची ओळख निर्माण झाली आहे.
ना डीजे, ना गुलाल
या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत डीजेचा वापर पूर्णपणे टाळला जातो. त्याऐवजी ढोल-ताशा, लेझीम आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणरायाचे स्वागत होते. तसेच गुलालाची उधळण न करता भाविकांवर पुष्पवृष्टी केली जाते, ज्यामुळे पर्यावरणपूरक उत्सवाचा संदेश दिला जात असल्याचे मंडळाचे समन्वयक रियाझ वजीर मुल्ला यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.