मुंबई

ठाण्यात दोन ठिकाणी आगीच्या घटना

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २० : शहरात शनिवारी (ता. १९) रात्री दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या घटना घडल्या असून वागळे इस्टेटमधील बांधकाम कामगारांच्या पत्र्याच्या झोपडीला आग लागली, तर देवदयानगर परिसरातील ट्युलिप इमारतीच्या आठव्या मजल्यावरील सदनिकेत आग लागली. या इमारतीत आगीमुळे झालेल्या धुराने अडकलेल्या सात रहिवाशांना ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाने सुखरूप बाहेर काढले.

वागळे इस्टेट, लालबहादूर शास्त्री रोडवरील कशीश पार्क येथे बांधकाम कामगारांसाठी उभारलेल्या पत्र्याच्या झोपडीला शनिवारी रात्री आग लागल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेला मिळाली. तातडीने अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सुमारे ८ वाजता त्या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यात यश आले. या आगीत झोपडीतील काही साहित्य, कपडे आणि इलेक्ट्रिक साहित्य जळून नुकसान झाले.

दरम्यान, शिवाईनगर येथील देवदयानगर, उन्नती गार्डनजवळील ट्युलिप इमारतीच्या आठव्या मजल्यावरील सदनिकेला रात्री आग लागली. त्यामुळे इमारतीत मोठ्या प्रमाणात धूर पसरल्याने सात रहिवासी अडकले होते. अग्निशमन दल, टीडीआरएफ आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने बचावकार्य करून सर्वांची सुखरूप सुटका केली. या आगीत सदनिकेतील टीव्ही, फ्रिज, एसी युनिट, इलेक्ट्रिक वायरिंग, कपाटे, पंखे आणि अन्य साहित्य जळून मोठे नुकसान झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: कुत्रा भुंकल्याने वाद पेटला; वाघोलीत दोन बहिणींवर दगड, सळई अन् लाथाबुक्क्यांनी हल्ला

Premium|Mithu Sen Artist : भाषा आणि रूढींना बगल देणारी कलावंत...

Pune Family Crime News : आईला बाहेर पाठवलं, ‘आधारकार्ड आणतो’ म्हणत घरी आला; मामाचा खून करून भाच्याची आत्महत्या

Sex Racket Busted : वाराणसीत खानावळ-बस बुकिंगच्या आडून 'कोडवर्ड' द्वारे सुरु होता वेश्याव्यवसाय; गेस्ट हाऊसवर छापा, ४ महिलांसह ७ जण ताब्यात

ICAI Global Expansion : जगातील ५० देशांत आयसीएआयचे जाळे निर्माण करण्याचे उद्दिष्ट आयसीएआयच्या राष्ट्रीय परिषदेत माहिती

SCROLL FOR NEXT